Holika Dahan 2023 Timing : भाई कब है होली ? जाणून घ्या होळीची अध्यात्मिक कथा, पंचांग; होलिका दहनाचा मुहूर्त आणि महत्त्व

आध्यात्म
भरत जाधव
Updated Mar 06, 2023 | 10:43 IST

Holika Dahan 2023 Timing in Marathi: मार्च महिन्याची चाहुल लागल्यावर सगळ्यांना वेध लागतात ते होळीचे. परंतु यावर्षी देशभरात दोन दिवस होळी (Holi)साजरी केली जाणार आहे कारण तारखांच्या योगायोगाने देशाच्या विविध भागातील लोक वेगवेगळ्या तारखांना होळी साजरी करू शकतात. हा सण नकारात्मक गोष्टींचं दहन करणारा हा सण आहे.

Holi 2023 Date in India, Time, Shubh Muhurt
काय आहे होळीचे शुभ मुहूर्त अन् नियम,जाणून घ्या  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • होलिका दहन दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला केले जाते.
 • या सणाला डोल पौर्णिमा, धुलवड, मांजल कुळी, उकुळी, फगवा किंवा शिमगा असेही म्हणतात.
 • हिंदू रीतीरिवाजनुसार भद्रा मुख आणि भद्रापुच्छ या काळात होलिका दहन करायचे असते.

Holika Dahan 2023 Timing in Marathi: मार्च महिन्याची चाहुल लागल्यावर सगळ्यांना वेध लागतात ते होळीचे. परंतु यावर्षी देशभरात दोन दिवस होळी (Holi) साजरी केली जाणार आहे कारण तारखांच्या योगायोगाने देशाच्या विविध भागातील लोक वेगवेगळ्या तारखांना होळी साजरी करू शकतात. हा सण नकारात्मक गोष्टींचं दहन करणारा हा सण आहे.  (Bhai kab hai holi ? Know the spiritual story of Holi, Panchag; Timing and Significance of Holika Dahan )

अधिक वाचा  :  तुम्हाला परीक्षेत टॉपर व्हाययंच मग लावा या सवयी

होलिका दहन दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला केले जाते आणि धूलिवंदन हा उत्सव फाल्गुन महिन्याच्या कृष्ण प्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी रंग गुलालाने साजरा केला जातो. तर काही भागात 5 दिवसांनी रंगपंचमी साजरी करून रंगाचा हा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. मात्र यंदा पौर्णिमा तिथीबाबत विचित्र परिस्थिती आहे. या कारणास्तव होलिका दहन आणि रंगोत्सव हे उत्तर पश्चिम भारत आणि पूर्व भारतात दोन वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जाऊ शकतात. 

अधिक वाचा  :  लग्नासाठी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे?

कधी आहे होळी 

पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. या सणाला डोल पौर्णिमा, धुलवड, मांजल कुळी, उकुळी, फगवा किंवा शिमगा असेही म्हणतात.  हिंदू पंचागनुसार यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी 6 मार्च 2023 ला संध्याकाळी 4.17 ते  7 मार्च 2023 संध्याकाळी 6.09 पर्यंत असेल. तर उदयतिथीनुसार आपल्याला होलिका दहन हा सण 6 मार्च 2023 करायचा आहे. हिंदू रीतीरिवाजनुसार भद्रा मुख आणि भद्रापुच्छ या काळात होलिका दहन करायचे असते.

अधिक वाचा  :  संयुक्त कुटुंबात असताना पतीसोबत कसा कराल रोमान्स

होळी तिथी प्रारंभ 

पंजाब, महाराष्ट्र, जम्मू, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये 6 मार्च रोजी प्रदोष कालावधीत पौर्णिमा आहे. अशा परिस्थितीत या राज्यांमध्ये 6 मार्चला होलिका दहन केले जाऊ शकते. तसेच 8 मार्च रोजी रंगपंचमी साजरी केली जाईल. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये 7 मार्चला होलिका दहन  केली जाईल. कारण या दिवशी प्रदोष काळात पौर्णिमा तिथी असेल. या दिवशी भद्रासुद्धा नसेल. म्हणूनच होलिका दहन केले जाईल. 

अधिक वाचा  : मुलं मुलीला भेटल्यानंतर सर्वात आधी बघतात या गोष्टी

 • पौर्णिमा तिथी प्रारंभ - 6 मार्च सोमवार, सायं 4 वाजून 18 मिनिटे ते
 • पौर्णिमा तिथी समाप्ती - 7 मार्च मंगळवार, सायं 6 वाजून 10 मिनिटे
 • भद्रा काळ प्रारंभ - 6 मार्च सोमवार, सायं 4 वाजून 48 मिनिटे ते
 • भद्रा काळ समाप्ती - 7 मार्च मंगळवार, सकाळी 5 वाजून 14 मिनिटे

 भद्राकाळ का महत्त्वाचा असतो? 

हिंदू धर्मानुसार आणि पौराणिकेत उल्लेखानुसार भद्रा काळात होळी पेटवणं हे अशुभ मानले जाते. यमराज हा भद्राचा स्वामी आहे, त्यामुळे भद्रा काळात कोणतेच शुभ कार्य करायला नको, असं शास्त्रात सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र सोडलं तर उत्तरेकडील शहरात फाल्गुन महिना सुरु होताच होळीला सुरुवात होते. पंचांग नुसार होलाष्टक सोमवारी 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. शास्त्रानुसार या काळात कुठलेही शुभ कार्य केले जात नाही.  

पौराणिक कथा

राजा हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून होलिका प्रल्हादाला घेऊन 8 दिवस अग्नीत बसली होती, पण 9 दिवशी प्रल्हाद वाचला आणि होलिकेचे दहन झाले तेव्हा विष्णू भक्तांनी रंगोत्सव साजरा केला. त्यामुळे 8 दिवस अशुभ मानले जातात. या घटनेनंतरच होळाष्टक साजरे केले जात असल्याचे मानले जाते.

होलिका दहन नियम 

 • एक मुलगा असलेल्या जोडप्याने होलिका दहन करु नये. शास्त्रानुसार हे अशुभ मानलं जातं. 
 • नवविवाहित महिलांनी होलिका दहन पाहू नये, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. 
 • होलिका दहनाच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नयेत.  
 • होलिका दहनाच्या दिवशी काळे कपडे परिधान करू नका. यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव होऊ शकतो.
 • होलिका दहना दिवशी केस मोकळे सोडू नका.
 • होलिका दहनाच्या रात्री कोणाच्याही घरी जेवू नका.
 • या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करुन बसू नका.
 • या दिवशी शिळे अन्न देखील खाऊ नये.
 • होलिका दहनाच्या दिवशी मादक पदार्थांचे सेवन चुकूनही करू नका.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी