Name Astrology: या ५ अक्षरांनी सुरू होणाऱ्या नावाच्या मुलांचे प्रेम होते अपयशी मिळतो धोका; जाणून घ्या अनोखे कारण 

आध्यात्म
Updated Jun 08, 2022 | 10:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Name Astrology । ज्योतिषशास्त्रामध्ये व्यक्तीच्या नावाला खूप महत्त्व आहे. ज्योतिषांच्या मते प्रत्येक अक्षराचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंध नक्कीच असतो. यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपले भविष्य कसे असेल हे देखील जाणून घेता येते.

these 5 name letters fail in love
या ५ अक्षरांच्या नावाची मुले बनतात देवदास  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रामध्ये व्यक्तीच्या नावाला खूप महत्त्व आहे.
  • ज्या मुलांचे नाव I अक्षराने सुरू होते ते खूप कलाकार प्रवृत्तीचे असतात.
  • ज्या मुलांचे नाव V अक्षराने सुरू होते ते खूप बेफिकीर असतात.

Name Astrology । मुंबई : ज्योतिषशास्त्रामध्ये व्यक्तीच्या नावाला खूप महत्त्व आहे. ज्योतिषांच्या मते प्रत्येक अक्षराचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंध नक्कीच असतो. यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये नावाच्या पहिल्या अक्षरावरून आपले भविष्य कसे असेल हे देखील जाणून घेता येते. या अक्षरांमध्ये अशी काही अक्षरे आहेत, ज्या अक्षरांनी सुरू होणाऱ्या नावाच्या मुलांना प्रेमात अनेकदा धोका मिळतो. चला तर म जाणून घेऊया कोणती अक्षरे आहेत ज्यांच्या नावाने सुरू होणाऱ्या मुलांची प्रेमात फसवणूक होते आणि याचे कारण काय आहे? (boys whose names begin with these 5 letters are at risk in love). 

अधिक वाचा : Google Pay आणि Paytm वापरताना या ५ गोष्टींची काळजी घ्या

B अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाची मुले 

ज्या मुलांचे नाव B अक्षराने सुरू होते, ते खूप आकर्षक आणि मनमोकळ्या स्वभावाचे असतात. हे लोक कोणत्याही मुलीकडे सहज आकर्षित होतात आणि कोणताही विचार न करता ते कोणावरही प्रेम करतात. त्यामुळे त्यांची प्रेमात फसवणूक होते.

I अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाची मुले 

ज्या मुलांचे नाव I अक्षराने सुरू होते ते खूप कलाकार प्रवृत्तीचे असतात. आपल्या कलात्मकतेच्या आणि आकर्षक प्रतिमेच्या जोरावर हे लोक कोणत्याही मुलीला आपल्याकडे आकर्षित करतात. हे लोक प्रेमाचे भुकेलेले असतात पण ते प्रेमाचा चुकीचा फायदाही घेतात. त्यामुळे अनेकदा त्यांची प्रेमात फसवणूक होते.

K अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाची मुले 

ज्या मुलांचे नाव K अक्षराने सुरू होते, अशा लोकांना प्रोफेशनल जीवन जगणे आवडते. हे लोक स्वभावाने अतिशय चंचलपणाचे असतात. कुठलीही सुंदर मुलगी दिसली की लगेच तिच्याकडे आकर्षित होतात आणि शेवटी तिच्यासमोर प्रेम व्यक्त करतात. पण ते कोणत्याही एका मुलीसोबत प्रेमाच्या बाबतीत एकनिष्ठ नसतात त्यामुळे अनेकदा त्यांची प्रेमात फसवणूक होते.

M अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाची मुले 

ज्या मुलांचे नाव M या अक्षराने सुरू होते अशी मुले कोणतीही गोष्ट त्यांच्या मनामध्ये दाबून ठेवतात. त्यांचा स्वभाव खूप हट्टी असतो. ज्या मुलीकडे ते आकर्षित होतात त्या मुलीवर त्यांचे खरे प्रेम असते. पण प्रेयसीसमोर उघडपणे गोष्टी शेअर न केल्याने त्यांना प्रेमात धोका पत्करल्याशिवाय हाती काहीच मिळत नाही.

V अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाची मुले 

ज्या मुलांचे नाव V अक्षराने सुरू होते ते खूप बेफिकीर असतात. त्यांच्या मनात येईल तेच ते काम करतात. मुलींसमोर आपले प्रेम व्यक्त करायला ते मागेपुढे पाहत नाहीत. पण त्यांच्या आत अहंकाराची भावना खूप प्रमाणात भरलेली असते. ते त्यांच्या प्रेमाबाबत कधीच गंभीर नसतात, त्यामुळे ते प्रेमात फसवणुकीचे बळी ठरतात.

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी