Sun Eclipse 2022: हिंदू धर्मात(Hinduism) तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. तुळशीला (Tulsi) हिंदू धर्मात देवी मानले जाते. प्रत्येक शुभ कार्यात तुळशीच्या पानांचा (leaves) वापर केला जातो. ज्यावेळी देवाला भोग अर्पण केला जातो तेव्हा त्यात तुळशीची डहाळी टाकली जाते. आज (मंगळवार) सूर्यग्रहण असून सूर्यग्रहणाच्या (Sun Eclipse) दिवशी सुतक काळापूर्वी अन्नात तुळशीची पाने टाकली जातात.परंतु आज तुळशीची पाने तोडणे निषिद्ध आहे. जर कोणी असे केले तर त्याला मोठे पाप लागू शकते. सूर्यग्रहणात तुळशीचे पानं तोडणं पाप का मानलं जातं या मागचे कारण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. (Breaking Tulsi leaves to add to food during Surya Grahan is a great sin, know why)
अधिक वाचा : कधी आहे भाऊबीज? जाणून घ्या ओवाळण्याची शुभ वेळ
भारतात सूर्यग्रहणाची वेळ आज दुपारी 4:22 ते सायंकाळ 5:41 पर्यंत असेल आणि त्याचा सुतक कालावधी सुरू झाला आहे. आज पहाटे 4.22 पासून सुतक कालावधी सुरू झाला आहे. तुळशीची पाने सुतक कालावधीपूर्वी अन्नात टाकण्यासाठी तोडली जातात. परंतु आता तुम्ही तुळशीची पाने तोडू शकत नाहीत. 24 ऑक्टोबरला अमावस्या होती. या दिवशी तुळशीची पाने तोडल्याने ब्रह्महत्याचे पाप होते. तर 23 ऑक्टोबर रविवार होता. रविवारी तुळशीला स्पर्श करण्यास मनाई आहे. रविवारी तुळशीची पाने तोडल्याने मोठे पाप लागते, असे मानले जाते.
अधिक वाचा : राज्यातील अनेक शहरात फटाक्यांनी लावली आग
तुळशीची पाने अन्नपदार्थांमध्ये घालण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. ग्रहण दरम्यान वातावरणात उपस्थित किरण नकारात्मक प्रभाव सोडतात. या काळात तुम्ही अन्न उघडे सोडल्यास किंवा तुम्ही ते अन्न खाल्ल्यास त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या शरीरात प्रवेश करतो. अशावेळी तुळशी पाने अन्नपदार्थात टाकली जातात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पाने टाकली जातात पण का, त्याचं कारण असे आहे की, तुळशीमध्ये पारा असतो आणि पारावर कोणत्याही प्रकारच्या किरणांचा परिणाम होत नाही. ग्रहणकाळात तुळशीमुळे आकाशातून येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि अन्नपदार्थ नकारात्मक प्रभावापासून वाचत असतात.
शास्त्रानुसार सूर्यग्रहण काळात काहीही खाल्ल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत, या काळात शिजवलेले अन्न खाण्यास मनाई आहे. भाजीपाला कापण्याचे आणि सोलण्यास देखील निषिद्ध मानले जाते. या काळात नखे कापणे, कंगवा करणे देखील शुभ मानले जात नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे ग्रहणकाळात कोणतेही नवीन किंवा शुभ कार्य सुरू करू नये. सुतक लावण्यापूर्वी पिण्याच्या पाण्यात तुळशीची पाने आणि घरात तयार केलेले अन्नपदार्थ ठेवावेत.