Akshaya Tritiya 2022:केवळ सोनेच नव्हे तर अक्षय्य तृतीयेला या गोष्टींची खरेदी मानली जाते शुभ

आध्यात्म
Updated Apr 26, 2022 | 11:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

खासकरून या दिवशी सोने खरेदीसाठी चांगला दिवस मानला जातो. असं म्हटलं जातं की या दिवशी खरेदी केलेली गोष्ट दीर्घकाळ टिकते. शुभ फळ देते तसेच त्यात वृद्धी होते. यंदा ३ मेला अक्षय्य तृतीया साजरी केली जात आहे. 

gold
सोनेच नव्हे तर अक्षय्य तृतीयेला या गोष्टींची खरेदी असते शुभ 
थोडं पण कामाचं
  • शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करू शकला नाहीत तर तुम्ही जव खरेदी करू शकता.
  • अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कवड्या खरेदी करून त्या माता लक्ष्मीला अर्पण करा.
  • अक्षय्य तृतीयेच्यादिवशी श्रीयंत्र खरेदी करणे शुभ मानले जाते.

Akshaya Tritiya 2022: अक्षय्य तृतीयेचा(akshay tritiya) दिवस वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. या दिवशी दिवसभर मुहूर्त(muhurt) असतो. त्यामुळे या दिवशी कोणताही मुहूर्त काढल्याशिवाय दिवसभरात कधीही लग्न, मुंडन, गृह प्रवेश, नव्या कामाची सुरूवात, घर-गाडीची खरेदी अशी शुभ कामे करता येतात. या दिवशी खरेदीसाठीही चांगला दिवस मानला गेला आहे. खासकरून या दिवशी सोने खरेदीसाठी चांगला दिवस मानला जातो. असं म्हटलं जातं की या दिवशी खरेदी केलेली गोष्ट दीर्घकाळ टिकते. शुभ फळ देते तसेच त्यात वृद्धी होते. यंदा ३ मेला अक्षय्य तृतीया साजरी केली जात आहे. 

अधिक वाचा - राज ठाकरेंच्या सभेचा टीझर प्रदर्शित होताच औरंगाबादेत जमावबंद

घरात येते सुख-समृद्धी

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी शुभ मानले जाते. मात्र सोन्याचे वाढते दर पाहता प्रत्येकाला या दिवशी सोने खरेदी करणं शक्य नसते. अशातच तुम्ही जर सोने खरेदी करू शकला नाही तर काही अशाही गोष्टी आहेत जे खरेदी केल्याने घरात सुख-समृ्द्धी येते. या गोष्टी माता लक्ष्मी आणि धन देवता कुबेर यांची कृपा मिळवून देते. 

शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करू शकला नाहीत तर तुम्ही जव खरेदी करू शकता. जव खरेदी करणेही सोने खरेदीइतकेच शुभ आहे. हे जव विष्णू देवाला अर्पण करा.त्यानंतर ते लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा. तुमच्या घरातील धनदौलत वाढत राहील.

कवड्या 

माता लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कवड्या खरेदी करून त्या माता लक्ष्मीला अर्पण करा. लक्ष्मी मातेची विधिवत पुजा करा आणि दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात लपेटून पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा. 

श्रीयंत्र

अक्षय्य तृतीयेच्यादिवशी श्रीयंत्र खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी श्रीयंत्राची विधिवत स्थापना आणि पुजा करा. घरात श्रीयंत्र आणण्यासाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ असतो. 

दक्षिणावर्ती शंख

दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी मातेला प्रिय आहे. हे घरात आणल्याने सुख-समृद्धी येते. दक्षिणावर्ती शंख पुजेच्या ठिकाणी विधिवत स्थापित करा. पुजा स्थानावर एकापेक्षा जास्त शंख नकोत. 

अधिक वाचा - जो बायडन यांना इलॉन मस्क यांची भीती, वाचा सविस्तर

घडा

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घडा खरेदी करणे शुभ मानले जाते. घडा खरेदी करून घरात ठेवणे आणि सरबताने भरून दान करणे दोन्ही शुभ असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी