Hanuman Ji 12 Name: बजरंगबलीजींच्या 12 नामांचा जप केल्याने जीवनातील दूर होतात सर्व अडथळे, जाणून घ्या पूजेचे नियम आणि विधी

आध्यात्म
भरत जाधव
Updated Aug 02, 2022 | 09:00 IST

मंगळवार (tuesday) हा हनुमानजींना (Hanuman) समर्पित आहे. या दिवशी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी लोक विधिपूर्वक पूजा (Worship ) करतात. जो व्यक्ती हनुमानजींची पूर्ण भक्तिभावाने पूजा करतो, त्याच्यावर बजरंगबली (bajrangbali) प्रसन्न होऊन त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतात. असे म्हणतात की हनुमानजींना धर्माच्या रक्षणासाठी अमरत्वाचे वरदान मिळाले आणि याच वरदानामुळे हनुमानजी आजही जिवंत आहेत आणि पृथ्वीवर राहून ते भक्तांचे आणि धर्माचे रक्षण करण्यात मग्न आहेत. 

Hanuman Ji 12 Name
बजरंगबलीजींच्या 12 नामांचा जप केल्याने जीवनातील दूर होतात सर्व अडथळे  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
 • ज्यांच्या कुंडलीत मंगळ ग्रह आहे अशाने दर मंगळवारी हनुमानाची पूजा केल्याने अनेक लाभ मिळतात.
 • हितशत्रूंपासून रक्षण करण्यासाठी मंगळवारी हनुमानाची उपासना करणे लाभदायक आहे.
 • जर एखाद्या व्यक्तीने हनुमानाच्या 12 नावांचे (12 नावे) स्मरण केले तर त्याचे सर्व दुःख, सर्व त्रास आणि समस्या संपतात.

Hanuman ji 12 Name And Chant: मंगळवार (tuesday) हा हनुमानजींना (Hanuman) समर्पित आहे. या दिवशी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी लोक विधिपूर्वक पूजा (Worship ) करतात. जो व्यक्ती हनुमानजींची पूर्ण भक्तिभावाने पूजा करतो, त्याच्यावर बजरंगबली (bajrangbali) प्रसन्न होऊन त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतात. असे म्हणतात की हनुमानजींना धर्माच्या रक्षणासाठी अमरत्वाचे वरदान मिळाले आणि याच वरदानामुळे हनुमानजी आजही जिवंत आहेत आणि पृथ्वीवर राहून ते भक्तांचे आणि धर्माचे रक्षण करण्यात मग्न आहेत. 

जोतिष्यशास्त्रानुसार (Astrology) ज्यांच्या कुंडलीत मंगळ ग्रह आहे अशाने दर मंगळवारी हनुमानाची पूजा केल्याने अनेक लाभ मिळतात. याशिवाय मंगळवारी उपवास केल्याने धैर्य आणि शक्ती प्राप्त होते. प्रयत्नांना यश प्राप्त होते. हितशत्रूंपासून रक्षण करण्यासाठी मंगळवारी हनुमानाची उपासना करणे लाभदायक आहे. दरम्यान हनुमानजींची 108 नावे आहेत. जर एखाद्या व्यक्तीने हनुमानाच्या 12 नावांचे (12 नावे) स्मरण केले तर त्याचे सर्व दुःख, सर्व त्रास आणि समस्या संपतात. जी व्यक्ती या 12 नामांचा नियमित जप करते त्या व्यक्तीवर  बजरंगबलीजींची विशेष कृपा राहते. आज आपण त्या बारा नावे जाणून घेणार आहोत..

Read Also : शेवटच्या षटकातील दोन चेंडूंतच वेस्ट इंडिजनं मिळवला विजय

हनुमानाची 12 नावे

हनुमान 
अंजनीसुत 
वायुपुत्र 
महाबल
रामेष्ट 
फाल्गुनसखा 
पिंगाक्ष
अमितविक्रम
उदधिक्रमण
सीताशोकविनाशन
दशग्रीवदर्पहा
लक्षमणप्राणदाता

Read Also : ड्रोन हल्ल्यात दहशतवादी अल-जवाहिरी ठार; बायडेन झाले खूश

असा जप करा

सकाळी, संध्याकाळी आणि दुपारी झोपण्यापूर्वी हनुमानजींच्या या 12 नावांचा जप करा. रोज सकाळी उठल्याबरोबर बेडवर बसून 11 वेळा न थांबता या 12 नामांचा जप करा. असे करणे आपल्यासाठी चांगले होईल.

नामस्मरणाचे फायदे

 • जे हनुमानजींचे नियमित नाम घेतात, त्यांना परमेश्वराची कृपा प्राप्त होते.
 • जो व्यक्ती सकाळी उठल्याबरोबर 11 वेळा बारा नाम घेतो त्याला दीर्घायुष्य लाभते.
 • जो व्यक्ती दुपारी हनुमानजींचे नाम घेतो तो धनवान होतो.
 • दुपार व संध्याकाळ नामस्मरण करणारी व्यक्ती कौटुंबिक सुखाने तृप्त होते.
 • रात्री झोपताना नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त होतो.

Read Also : Video: भयंकर... १५ वर्षीय मुलीने बहिणीची तलवारीने मानच उडवली

हनुमानाची पूजा विधी 

मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नान करून हनुमान चालीसाचे पठण करावे. अशी मान्यता आहे की मंगळवारी हनुमान चालीसासोबत बजरंग बाण पठण केले तर ते खूप फायदेशीर असते. विधीपूर्वक पूजा केल्याने हनुमान प्रसन्न होतात त्यांच्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात असे देखील मानले जाते. 

हनुमानाच्या व्रताचे नियम

मंगळवारी हनुमानाची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. परंतु हनुमानाच्या व्रताचे काही नियम आहेत जे पाळणे आवश्यक आहे.

नियम 

 • हनुमानाची पूजा सकाळी आणि संध्याकाळीच केली जाते.
 • हनुमानाच्या पूजेमध्ये फक्त लाल रंगाच्या फुलांचाच वापर करावा.
 • तुम्ही हनुमानाची पूजा करत असाल तर लक्षात ठेवा की नेहमी लाल धाग्याची वात बनवून दिवा लावावा.
 • हनुमानाची साधना करताना ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. पूजेदरम्यान मनात कामुक विचार येऊ देऊ नका.
 • मंगळवारी मांस आणि दारूचे सेवन करू नये.
 • हनुमानाच्या पूजेमध्ये चरणामृतचा वापर करू नये.हे लक्षात ठेवा की महिलांनी हनुमानाच्या मूर्तीला अजिबात स्पर्श करू नये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी