Venus Transit 2022: हे उपाय केल्याने या राशींना शुक्र संक्रमणाच्या वाईट प्रभावापासून मुक्ती मिळेल

आध्यात्म
Updated May 13, 2022 | 09:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Venus Transit 2022 । ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधी नंतर राशी बदलतो आणि त्या राशीबदलाचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर पडत असतो. आज आपण शुक्राच्या राशीच्या बदलाविषयी भाष्य करणार आहोत.

By doing this, these zodiac signs will be freed from the ill effects of Venus infection
अशी मिळवा शुक्र संक्रमणाच्या वाईट प्रभावापासून मुक्ती   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधी नंतर राशी बदलतो.
  • धन आणि वैभवाचा दाता शुक्र देव मेष राशीत प्रवेश करणार आहे.
  • हे संक्रमण २३ मे रोजी होणार आहे.

Venus Transit 2022 । मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधी नंतर राशी बदलतो आणि त्या राशीबदलाचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर पडत असतो. आज आपण शुक्र ग्रहाच्या राशीबदलाविषयी भाष्य करणार आहोत. दरम्यान धन आणि वैभवाचा दाता शुक्र देव मेष राशीत प्रवेश करणार आहे, हे संक्रमण २३ मे रोजी होणार आहे, ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. परंतु ३ राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हे संक्रमण लाभदायक सिद्ध होऊ शकते. चला तर म जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या तीन लकी राशी. (By doing this, these zodiac signs will be freed from the ill effects of Venus infection). 

अधिक वाचा : घरात चुकूनही लावू नये सात घोड्यांचा असा फोटो

काय आहेत शुक्रवारचे उपाय

* ज्या लोकांचा शुक्रवार कमजोर आहे, त्यांनी शुक्रवारी व्रत करणे गरजेचे आहे.
* २१ किंवा ३१ व्रत करणे गरजेचे. 
* शुक्र दोषाला दूर करण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करून शुक्राय मंत्राचा जप केला पाहिजे. 
* शुक्र मजबूत करण्यासाठी पांढरे वस्त्र, तांदूळ, तूप, साखर इत्यादी दान करा.
* याशिवाय तुम्ही अलंकाराचे साहित्य, कपूर, दही इत्यादी वस्तू दान करू शकता. 
* परफ्यूम वापरल्याने शुक्र बळकट होतो. 
* महिलांचा सन्मान केल्यानेही शुक्र मजबूत होतो. 

१) मिथुन राशी - मिथुन राशीमध्ये शुक्र ग्रह ११ व्या भावात संक्रमण करेल, ज्याला महसूल आणि लाभाचे स्थान म्हटले जाते. यामुळे या कालावधीत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. सोबतच महसूलाचे नवीन मार्ग मिळू शकतात. कोणत्याही व्यावसायिक गुंतवणुकीमध्ये फायदा होऊ शकतो. लक्षणीय बाब म्हणजे आताच्या घडीला शुक्र तुमच्या संपत्ती आणि कुटुंबातील दुसऱ्या भावातील आणि संगत आणि भागीदारीच्या सातव्या भावातील स्वामी असतील. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराची खूप साथ मिळेल. 

२) कर्क राशी - तुमच्यासाठी शुक्राचे संक्रमण दुसऱ्या भावात होईल, ज्याला कार्यक्षेत्र आणि नोकरीचे स्थान म्हटले जाते. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. प्रमोशन देखील होण्याची शक्यता आहे. कामाच्या क्षेत्रातील वरिष्ठ मंडळी तुमची प्रशंसा करेल. जे लोक प्रॉपर्टी डीलर्स, रियल इस्टेट एजेंट्स यांसारख्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना या कालावधीत विशेष लाभ मिळू शकतो. याशिवाय भागीदारीच्या कामामध्ये यश मिळू शकते. 

३) मीन राशी - तुमच्या राशीतून शुक्र देवाचे संक्रमण दुसऱ्या भावात होईल, ज्याला वाणी आणि धन यांचा भाव म्हटले जाते. या कालावधीत तुम्हाला अचानक धनाचा लाभ होऊ शकतो. याशिवाय जर तुमचे पैसे इतर कुठे अडकले असतील तर ते मिळण्याची शक्यता आहे. ज्या लोकांची पगारवाढ थांबली होती त्यांचा विषय या काळात मार्गी लागेल. या कालावधीत तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करू शकता, हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. तसेच ज्या लोकांचे कार्यक्षेत्र वाणीशी संबंधित आहे, जसे की वकील, शिक्षक यांच्यासाठी हा कालावधी लाभदायक ठरेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी