मुंबई: दाम्पत्य जीवनात पती-पत्नीमध्ये मतभेद होणे ही सामान्य बाब आहे. जिथे दोन लोक एकत्र येतात तिथे आपापसात वाद,मतभेद हे होतातच. मात्र हे जर दररोज होऊ लागले आणि वादाचे कारण ठरू लागले तर एक मोठी समस्या बनते. वास्तुशास्त्रात(vastu shastra) यासाठी काही हलके उपाय सांगितले आहेत. लहानमोठ्या गोष्टींवरून होणारे मतभेद, पती-पत्नीमध्ये होणारे वाद दूर करण्यासाठी कापूर(camphor) अतिशय फायदेशीर ठरतो. वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक उर्जा(negative energy) दूर करण्यासाठी कापूर अतिशय लाभदायक आहे.camphor benefits in vastu shastra
अधिक वाचा - बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी या देवांची पूजा केली जाते
कापूर अनेक वास्तुदोष दूर करण्याचे काम करतो. वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी कापूर अतिशय लाभदायक आहे. कापूर अनेक वास्तुदोष दूर करतो. पती-पत्नीमधील भांडणे, वाद दूर करण्यासाठी छोटासा कापूर मोठे काम करते. जाणून घेऊया पती-पत्नीमधील प्रेम आणि सामंजस्य वाढवण्यासाठी कापूरचा वापर कसा करता येईल.
अनेकदा पती-पत्नीमध्ये कोणत्याही गोष्टीवरून मतभेद होऊ लागतात. दोघांमधील ताळमेळ योग्य नसतो. वास्तुनुसार अशात गायीच्या तुपात दररोज कापूर बुडवून लावा. हा कापूर घराच्या एका कोपऱ्यात ठेवा ज्यामुळे संपूर्ण घरात याचा वास दरवळेल आणि घरातील नकारात्मक उर्जा दूर होईल.
याशिवाय जर दाम्पत्य जीवनात मोठ्या प्रमाणात भांडणे होत असतील आणि हे वाद घटस्फोटापर्यंत पोहोचत असतील तर वास्तुनुसार पती-पत्नीने कापूर रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवावा आणि सकाळी कोणालाही न सांगता जाळून टाका. असे मानले जाते की असे केल्याने घरात सुख-शांती राहते आणि आपापसातील मतभेद दूर होतात.
अधिक वाचा - नृसिंह जयंती निमित्त शेअर करा मराठी शुभेच्छा
याशिवाय घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी घराच्या खोलीत कपूर आणि लवंग एका वाटीत जाळा. हा उपाय दररोज केल्याने घरात सुखशांती येते आणि लक्ष्मीचा वास राहतो.