cardamom or cardamum or choti elaichi che upay : हिरवी वेलची अथवा छोटी वेलची म्हणून ओळखली जाणारी वेलची ही दिसायला आकाराने लहान असली तरी मोठी कमाल करू शकते. मूर्ती लहान पण किर्ती महान ही म्हण खरी करू शकते. छोटी वेलची सोबत बाळगून आपण आपली अनेक रखडलेली कामं पूर्ण करू शकाल. ज्योतिषशास्त्राने हा छोट्या वेलचीचा सोपा आणि मोठा प्रभाव असलेला उपाय सुचविला आहे.
धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय
आपल्या सोबत बाळगायच्या पैसे ठेवायच्या पाकिटात अथवा पैसे ठेवायच्या पर्समध्ये पाच छोट्या वेलचीच्या पाकळ्या ठेवा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास आणि उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे ज्योतिषशास्त्र सांगते. उपाय केल्यापासून जास्तीत जास्त एक-दोन महिन्यात सकारात्मक परिणाम दिसून येतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते.
घरात ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ड्रॉवर वा कपाट वा तिजोरीत पाच छोट्या वेलचीच्या पाकळ्या ठेवा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास आणि उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे ज्योतिषशास्त्र सांगते. उपाय केल्यापासून जास्तीत जास्त एक-दोन महिन्यात सकारात्मक परिणाम दिसून येतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते.
कौटुंबिक पातळीवर सतत वाद होत असतील, वारंवार पती-पत्नी यांच्यात बेबनाव होत असेल तर पुरुषाने शर्टाच्या खिशात छोट्या वेलचीच्या तीन पाकळ्या ठेवाव्या. महिलेने साडीच्या पदराला वा ओढणीला छोट्या वेलचीच्या तीन पाकळ्या बांधून ठेवाव्या. यामुळे कौटुंबिक समस्या दूर होण्यास मदत होते. पती-पत्नीमधील बेबनाव दूर होण्यास मदत होते, असे ज्योतिषशास्त्र सांगते. उपाय केल्यापासून जास्तीत जास्त एक-दोन महिन्यात सकारात्मक परिणाम दिसून येतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते.
दर शुक्रवारी पतीने पत्नीला आणि पत्नीने पतीला छोट्या वेलचीच्या दोन पाकळ्या प्रेमाने भरवाव्या. यातून बेबनाव दूर होण्यास, प्रेम वाढण्यास मदत होते, असे ज्योतिषशास्त्र सांगते. उपाय केल्यापासून जास्तीत जास्त एक-दोन महिन्यात सकारात्मक परिणाम दिसून येतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते.
आंघोळीचे पाणी कोमट वा गरम पाणी ज्या बादलीत घेतले आहे त्याच बादलीत छोट्या वेलचीच्या दोन पाकळ्या टाका. नंतर वेलची युक्त कोमट वा गरम पाण्याने आंघोळ करा. आंघोळ करताना कुलदेवतेचे नामस्मरण करा. आंघोळीनंतर कुलदेवतेला मनोभावे प्रार्थना करा. यामुळे आपल्या मनातील सदिच्छा पूर्ण होण्यास, आर्थिक प्रश्न सुटण्यास, उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असे ज्योतिषशास्त्र सांगते. उपाय केल्यापासून जास्तीत जास्त एक-दोन महिन्यात सकारात्मक परिणाम दिसून येतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)