Chaitra Navratri 2023 : 9 दिवसांची चैत्र नवरात्र 'या' दिवसापासून सुरू होणार; जाणून घ्या महत्त्व आणि पूजाविधी

Chaitra Navratri 2023 or Chaitra Navratra Date Time Muhurat or Muhurta,  Shubh Muhurat or Shubha Muhurta : यंदा चैत्र नवरात्र बुधवार 22 मार्च 2023 पासून सुरू होणार आहे. चैत्र नवरात्रीची सुरुवात गुढी पाडवा या सणाने होईल.

Chaitra Navratri or Chaitra Navratra
चैत्र नवरात्र  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 9 दिवसांची चैत्र नवरात्र 'या' दिवसापासून सुरू होणार
  • जाणून घ्या महत्त्व चैत्र नवरात्रीचे महत्त्व
  • जाणून घ्या चैत्र नवरात्रीचा पूजाविधी

Chaitra Navratri 2023 or Chaitra Navratra Date Time Muhurat or Muhurta,  Shubh Muhurat or Shubha Muhurta : यंदा चैत्र नवरात्र बुधवार 22 मार्च 2023 पासून सुरू होणार आहे. चैत्र नवरात्रीची सुरुवात गुढी पाडवा या सणाने होईल. सलग नऊ दिवस चैत्र नवरात्र आहे. चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी गुरुवार 30 मार्च 2023 रोजी श्रीराम नवमी आहे. घटस्थापना करण्यासाठी बुधवार 22 मार्च 2023 रोजी सकाळी 06.29 ते 07.39 या काळात शुभ मुहूर्त आहे. 

चैत्र नवरात्रीच्या काळात देवीचे पृथ्वीवर आगमन होते. देवीला प्रसन्न केले तर अडीअडचणी दूर होण्यास मदत होते. प्रगती होते. आर्थिकदृष्ट्या प्रगती होते.

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

हिंदू पंचांगानुसार मार्च-एप्रिल दरम्यान चैत्र नवरात्र अर्थात पहिले नवरात्र, जून-जुलै दरम्यान दुसरे नवरात्र, सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान तिसरे नवरात्र आणि जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान चौथे नवरात्र असते. यापैकी चैत्र नवरात्र अर्थात पहिले नवरात्र आणि शारदीय नवरात्र अर्थात तिसरे नवरात्र हे दोन्ही नवरात्रोत्सव प्रकटपणे साजरे करतात. बाकीचे दोन नवरात्रोत्सव गुप्तपणे साजरे केले जातात. 

चैत्र नवरात्रीत सूर्य मेष राशीत प्रवेश करतो. चैत्र नवरात्रीपासून नववर्ष पंचांगाची गणना सुरू होते. नवरात्र पूजनाने घरातील नकारात्मकता कमी करून सकारात्मकता वाढवली जाते. मनापासून पूजाविधी केल्याने चैत्र नवरात्रीत घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. 

वेगाने वजन कमी करायचे असेल तर बेडवर करा ही कृती

स्पर्म काउंट वाढवणारे 7 सुपरफूड

चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. तिसर्‍या चैत्र नवरात्रीत प्रभू विष्णूंनी मत्स्य रूपात पृथ्वीची स्थापना केली होती. नंतर प्रभू विष्णू प्रभू राम या रूपात देखील चैत्र नवरात्रीत प्रकट झाले होते. म्हणून या दिवसांचे खूप महत्त्व आहे. चैत्र नवरात्रीत हवन पूजन आणि आरोग्याचे खूप फायदे आहेत. यामुळे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत मिळते.

चैत्र प्रतिपदेला दुर्गा देवी प्रकट झाली आणि दुर्गा देवीच्या सूचनेवरून ब्रह्मदेवाने ज्या दिवशी सृष्टीची रचना केली तो दिवस होता चैत्र प्रतिपदा. याच कारणामुळे चैत्र प्रतिपदेपासून हिंदू नववर्ष साजरे केले जाते. तसेच श्रीविष्णूंनी चैत्र शुद्ध नवमीला सातवा रामावतार घेतला होता म्हणून चैत्र शुद्ध नवमी राम नवमी म्हणून ओळखली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस देवी व्रत, पूजन आणि भजन केले जाते.

Coconut Water : नारळ पाणी पिण्याचे फायदे

प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करताना घ्यायची काळजी

पहिल्या दिवशी दैवी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंध माता, सहाव्या दिवशी कात्यायणी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी तर नवव्या दिवशी सिद्धिदात्री अशा देवींच्या नऊ स्वरुपाचे पूजन केले जाते.

घरात चैत्र नवरात्र साजरी केली, देवीचे मनापासून पूजन केले तर घरात सुखसमृद्धी नांदू लागते. घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते. घरातील सदस्यांची आर्थिक, समाजिक आणि सांस्कृतिक प्रगती होते. यासाठीच चैत्र नवरात्र साजरे करण्याला महत्त्व आहे. 

चैत्र नवरात्रीच्या काळात देवीसमोर सतत तुपाचा दिवा तेवत राहील याची काळजी घेतली जाते. देवीचे मनापासून पूजन केले जाते. देवी समोर सलग नऊ दिवस दररोज दुर्गासप्तशतीचे पठण केले जाते.

चैत्र नवरात्रीचे नऊ दिवस

  1. पहिला दिवस : बुधवार 22 मार्च 2023, चैत्र प्रतिपदा, घटस्थापना, दैवी शैलपुत्री
  2. दुसरा दिवस : गुरुवार 23 मार्च 2023, द्वितीया, देवी ब्रह्मचारिणी
  3. तिसरा दिवस : शुक्रवार 24 मार्च 2023, तृतिया, देवी चंद्रघंटा
  4. चौथा दिवस : शनिवार 25 मार्च 2023, चतुर्थी, देवी कुष्मांडा
  5. पाचवा दिवस : रविवार 26 मार्च 2023, पंचमी, देवी स्कंध माता
  6. सहावा दिवस : सोमवार 27 मार्च 2023, षष्ठी, देवी कात्यायणी
  7. सातवा दिवस : मंगळवार 28 मार्च 2023, सप्तमी, देवी कालरात्री
  8. आठवा दिवस : बुधवार 29 मार्च 2023, अष्टमी, देवी महागौरी
  9. नववा दिवस : गुरुवार 30 मार्च 2023, नवमी, देवी सिद्धिदात्री

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी