Chitra Navratri : चैत्र नवरात्री (Chaitra Navratri) पासून हिंदू नववर्षाची सुरवात होते. यंदा बुधवारी म्हणजेच 22 मार्च रोजी चैत्र नवरात्रौत्सवाची सुरुवात होत आहे. याच दिवशी गुढीपाडवा (Gudi Padwa) म्हणजे मराठी नववर्षाची सुरवात होत आहे. चैत्र नवरात्रीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर घटस्थापना करण्यात येते आणि त्यानंतर दुर्गा मातेची विधीवत पूजा करण्यात येते. ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाच्या वर्षी नवरात्रीच्या दिवशी 110 वर्षांनंतर विशेष योग निर्माण होत आहे.
चैत्र नवरात्रौत्सवाची सुरुवात खूपच शुभ योगात होत आहे. या काळात 4 योगांचा निर्माण होत आहे. चैत्र नवरात्रीला 110 वर्षांनंतर प्रमुख ग्रहांचे राशी परिवर्तन होत आहे जो एक विशेष योग आहे. जाणून घ्या या विशेष योगायोगामुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींवर देवीची विशेष कृपा असेल आणि त्याचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.
हे पण वाचा : हात-पाय सुन्न होणे गंभीर आजाराचे लक्षण?
चैत्र नवरात्रोत्सवाला निर्माण होणारा विशेष योग मुख्यत: मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुभ असणार आहे. या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होणार आहे. रखडलेले काम मार्गी लागेल. आरोग्यात सुधारणा होईल. नवरात्रीच्या काळात अंबेमाताची विशेष कृपा मेष राशीच्या व्यक्तींवर असणार आहे.
हे पण वाचा : तुम्हीही सकाळी ब्रश न करता खाता? वाचा काय आहेत त्याचे तोटे
या नवरात्रीत तुम्हाला दुर्गामातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश प्राप्त होईल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळेल. आर्थिक लाभ प्राप्त होईल. नव्या कामाची, कार्याची सुरुवात करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे.
हे पण वाचा : सकाळी रिकाम्या पोटी काळा चहा पिण्याचे 5 जबरदस्त फायदे
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी चैत्र नवरात्रीचा काळ खूपच खास असणार आहे. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा उत्तम काळ असणार आहे. नव्या नोकरीची संधी उपलब्ध होईल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन संदर्भात चांगली बातमी मिळू शकते. विवाहाचा योग निर्माण होईल.
चैत्र नवरात्रीच्या काळात तुम्हाला शुभवार्ता, आनंदाची बातमी मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नव्या नोकरीची संधी उपलब्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. जोडीदारासोबतचे नाते आणखी घट्ट होईल. धनलाभ होईल.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.)