Chaitra purnima: हनुमान जयंती प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पोर्णिमेला साजरी केली जाते. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी चंद्राची तसेच श्रीविष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. येत्या 5 एप्रिल रोजी हिंदू नववर्षातील पहिली पौर्णिमा साजरी केली जाईल. या चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा म्हटलं जातं. (Chaitra purnima vrat 2023: When is Chaitra Purnima on 5th April or 6th; Know the exact date and time)
चैत्र पोर्णिमा कधी आहे, याविषयी भाविकांच्या मनात गोंधळ आहे. पोर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा केली जाते. 5 एप्रिल अनेकजण व्रत ठेवतील, पोर्णिमेला चंद्राचे दर्शन करता येईल. परंतु 6 एप्रिलला उपवास कराल तर चंद्राचे दर्शन होणार नाही. हिंदू पंचांगानुसार, यावर्षी चैत्र पौर्णिमा 5 एप्रिल 2023 रोजी सकाळी 09.19 वाजता सुरू होईल आणि 06 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10.04 वाजता समाप्त होईल. त्यामुळे यंदा चैत्र पौर्णिमेची पूजा 5 एप्रिल 2023 रोजी करण्यात येणार आहे. या दिवशी सत्यनारायण म्हणजेच भगवान विष्णूची पूजा केली जाते. विष्णूची पूजा केल्यानं लक्ष्मी माता प्रसन्न होत असते.