Chaitra Vinayak Chaturthi 2023: चैत्र विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त, मंत्र, महत्त्व आणि उपासनेची पद्धत जाणून घ्या

आध्यात्म
भरत जाधव
Updated Mar 24, 2023 | 17:33 IST

Chaitra Vinayak Chaturthi : या दिवशी गणरायाची पूजा केल्याने आपल्या कामात आपल्याला यश मिळत असते. इतकेच नाही तर आपल्याला आयुष्यभर धन, सुख, समृद्धी, अपत्याचं सुख मिळत असते. आपल्या घरात आनंद आणि सुख नांदत असते. यामुळे आज आपण विनायक चतुर्थीचं महत्त्व आणि मुहूर्त जाणून घेणार आहोत..

Chaitra Vinayak Chaturthi 2023
चैत्र विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त, महत्त्व जाणून घ्या  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गौरीपुत्र गणेशाची चांदनी, चमेली किंवा पारिजात या फुलांनी पूजा केल्याने बुद्धी आणि विद्या वाढते.
  • शास्त्रानुसार अमावास्येनंतर येणार्‍या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात.
  • चैत्र महिन्यातील विनायक चतुर्थीवर भाद्रची सावली राहील.

Chaitra Vinayak Chaturthi 2023: चैत्र नवरात्रीच्या चौथा दिवस  गणरायाला समर्पित आहे. या दिवशी विनायक चतुर्थीची उपासना केली जाते. चैत्र महिन्याच्या विनायक चतुर्थीचं विशेष महत्त्व आहे. कारण या व्रतावेळी गणपती बाप्पा आणि माता दुर्गेचा चौथा अवतार कुष्मांडाची उपसाना केली जाते. या दिवशी गणरायाची पूजा केल्याने आपल्या कामात आपल्याला यश मिळत असते. इतकेच नाही तर आपल्याला आयुष्यभर धन, सुख, समृद्धी, अपत्याचं सुख मिळत असते. आपल्या घरात आनंद आणि सुख नांदत असते. यामुळे आज आपण विनायक चतुर्थीचं महत्त्व आणि मुहूर्त जाणून घेणार आहोत..   (Know Chaitra Vinayaka Chaturthi auspicious time, mantra, significance and method of worship)

अधिक वाचा  :  उन्हाळ्यात पुण्यात फिरता येणारी ठिकाणं

शास्त्रानुसार अमावास्येनंतर येणार्‍या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि पौर्णिमेनंतर येणार्‍या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणानुसार, या दोन्ही चतुर्थीच्या तारखा भगवान गणेशाला समर्पित आहेत. 
 अधिक वाचा  : तुमच्या या चुका खराब करतील ​लिव्ह-इन-रिलेशनशिप​

चैत्र विनायक चतुर्थी 2023 तारीख (Chaitra Vinayak Chaturthi 2023 Date)

चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या विनायक चतुर्थी 25 मार्च 2023 रोजी शनिवारी होणार आहे. या दिवशी चंद्राचं दर्शन करण्यास मनाई करण्यात आली आहे. या दिवशी भाविकांना श्री गणेशाची पूजा केली जाते आणि त्यांना बुद्धी आणि ज्ञानाची प्राप्ती होत असते. भाविकांच्या  वाणीतील दोष दूर होत असतात.  

चैत्र विनायक चतुर्थी 2023 मुहूर्त ((Chaitra Vinayak Chaturthi 2023 Muhurat)
 

पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवार, 24 मार्च 2023 रोजी दुपारी 04:59 वाजता सुरू होईल. तिथी शनिवार, 25 मार्च 2023 रोजी दुपारी 04:23 वाजता समाप्त होईल.


गणपतीच्या पूजेची वेळ  

 सकाळी 11 वाजून  14 मिनिटे ते दुपारी  01.41 (25 मार्च 2023)
 
चंद्रोदय समय -

सकाळी 8 वाजून 31 (शुक्ल पक्षाचा चंद्र सकाळी उगवतो, या दिवशी चंद्राचे दर्शन करू नये.)
 

विनायक चतुर्थीला अशी करा गणपतीची पूजा (Vinayak Chaturthi Puja Vidhi)

विनायक चतुर्थीवर गणपतीची पूजा करताना सिंदूर लावावा. यामुळे गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात आणि आपले सर्व दु:ख दूर करत असतात.  पूजा करताना गणपतीला लाल रंग सिंदूरचा टिळा लावावा. टिळा लावताना "सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्। शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम्॥ हा मंत्र म्हणावा. त्याचा टीळा स्वत:ला लावावा. 
 अधिक वाचा  : पोरं झाल्यानंतर नवरा-बायकोचं नातं कसं घट्ट बनवणार

श्री गणेशाचे नाव विनायक का आहे?

गणपतीला विनायक या नावाने ओळखले जाते. गणरायाला हे नाव का देण्यात आले आहे.  कारण गणपती बाप्पा भविकांचे दु:ख संकटं दूर करतात.  देवांमध्ये गणरायाची सर्वात आधी पूजा केली जाते. कोणतेही काम सुरू करण्याआधी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. चतुर्थीच्या दिवशी जे भाविक व्रत करणार आहेत त्यांनी फळांचे सेवन करावे. साबुदाण्याची खिचडी , शेंगदाणे, बटाटे सुद्धा  खाऊ शकतात. 

अधिक वाचा  : जोडीदाराशी मेसेजमध्ये या गोष्टी नका बोलू, नाहीतर...
 
पूजा करताना गणेश मंत्राचा जप करावा. मंत्राचा उच्चार करून आवाहन केल्यानंतर दुर्वा, फुले, चंदन, दही, सुपारीची पाने आणि मिठाई इत्यादी श्रीगणेशाला अर्पण करा, असे केल्यानंतर उदबत्ती लावून विनायक चतुर्थी कथेचे पठण करावे. पठणानंतर श्रीगणेशाची आरती करून प्रसाद वाटावा. लाल रंगाचे जास्वंदाचे फूल गणपतीला अतिशय प्रिय आहे. गौरीपुत्र गणेशाची चांदनी, चमेली किंवा पारिजात या फुलांनी पूजा केल्याने बुद्धी आणि विद्या वाढते.

अधिक वाचा  : संसाराचा काडीमोड झाला तर असं रहा खूश


चैत्र विनायक चतुर्थीवर भाद्रची सावली (Chaitra Vinayak Chaturthi 2023 Bhadra Kaal Time)
 

चैत्र महिन्यातील विनायक चतुर्थीवर भाद्रची सावली राहील. 25 मार्च 2023 रोजी, भद्रा सकाळी 04.35 वाजता सुरू होत आहे आणि संध्याकाळी 04.23 वाजता समाप्त होईल. भाद्राचा काळ हा अशुभ मानली जातो, परंतु या दिवशी भद्रा स्वर्गात जाईल, त्यामुळे पृथ्वीवर त्याचा परिणाम होणार नाही. भद्रामध्ये शुभ कार्य करण्यास मनाई आहे परंतु गणपतीच्या पूजेमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी