Champa Shashti 2022: या दिवशी आहे चंपा षष्ठी व्रत, जाणून घ्या व्रताची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

आध्यात्म
भरत जाधव
Updated Nov 25, 2022 | 15:24 IST

पंचांगानुसार, सोमवार, 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 01.35 वाजता मंगळ मासातील शुक्ल पक्षात षष्ठी तिथीला सुरू होत आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी मंगळवार 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.04 वाजता संपेल.अशा स्थितीत उदयतिथीनुसार मंगळवार 29 नोव्हेंबर रोजी चंपा षष्ठीचे व्रत केले जाणार आहे.

Champa Shashthi 2022: Champa Shashti Date,Time
या दिवशी आहे चंपा षष्ठी व्रत, जाणून घ्या व्रताची तिथी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • या दिवशी भगवान शंकराच्या मार्कंडेय रुपाची पूजा केली जाते.
  • यावर्षी चंपा षष्ठी मंगळवारी 29 नोव्हेंबरला येत आहे.
  • महाराष्ट्रातील भाविक या दिवशी भगवान शंकराचा अवतार खंडोबाची पूजा करतात.

Champa Shashti 2022: अगहन माह किंवा मार्गशीर्ष (Margashirsh) महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथिला चंपा षष्ठीचं व्रत ठेवलं जातं. चंपा षष्ठीचा दिवस भगवान शिवाला (Lord Shiva) समर्पित आहे. महादेवाचा (Mahadev)अवतार खंडोबालाही (Khandoba dev) ही षष्ठी समर्पित आहे.  (Champa Shashthi 2022: Champa Shashti Date,Time, Rituals And Significance in maharashtra)

अधिक वाचा  : नाशिकच्या घटनेनंतर पाहा नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ

या दिवशी भगवान शंकराच्या मार्कंडेय रुपाची पूजा केली जाते. स्कंदपुराणानुसार हा उत्सव भगवान कार्तिकेयालाही समर्पित आहे. त्यामुळेच या सणाला स्कंद षष्ठी असेही म्हणतात. दरम्यान, यावर्षी चंपा षष्ठी मंगळवारी  29 नोव्हेंबरला येत आहे. महाराष्ट्रातील भाविक या दिवशी भगवान शंकराचा अवतार खंडोबाची पूजा करतात. 

चंपा षष्ठी 2022 कधी आहे  

पंचांगानुसार, सोमवार, 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 01.35 वाजता मंगळ मासातील शुक्ल पक्षात षष्ठी तिथीला सुरू होत आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी मंगळवार 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.04 वाजता संपेल.अशा स्थितीत उदयतिथीनुसार मंगळवार 29 नोव्हेंबर रोजी चंपा षष्ठीचे व्रत केले जाणार आहे.

अधिक वाचा  : पेढ्यातून उंदराचं औषध देऊन केला अल्पवयीन मुलीचा खून

रवि आणि द्विपुष्कर योगातील चंपा षष्ठी

यावेळी चंपाषष्ठीच्या दिवशी रवी योग आणि द्विपुष्कर योग बनत आहे. या दिवशी सकाळपासून दुपारी 02.53 पर्यंत ध्रुव योग आहे.  रवी योग सकाळी 6 वाजून 55 मिनिट ते सकाळी 8 वाजून 38 मिनिटापर्यंत असेल. तर द्विपुष्कर योग हा सकाळी 11 वाजून 04 मिनीट ते पुढे दुसऱ्या दिवशी 30 नोव्हेंबर सकाळी 06 वाजून 55 मिनिटापर्यंत असणार आहे. 

अधिक वाचा  : शिंदे ग्रुपचे आमदार बांगरांची कर्मचाऱ्यांना धमकी

चंपा षष्ठी 2022 पुजेचा मुहूर्त

  • शुभ वेळ: सकाळी 06:45 ते 08:05 पर्यंत
  • लाभ-उन्नति मुहूर्त: दुपारी 12:06 वाजेपासून ते दुपारी  01:26  वाजेपर्यंत असेल. 
  • अमृत-सर्वोत्तम मुहूर्त: दुपारी  01:26 वाजेपासून ते  दुपारी 02:46 वाजेपर्यंत असेल. 

या दिवशी केला जाणाऱ्या उपवासाचे महत्त्व  

या दिवशी भगवान महादेवाची पूजा केली जाते.  महादेवाची पूजा केल्याने आपले पाप मिटत असतात. महादेवाची पूजा केल्याने आपल्या सर्व समस्या दूर होत असतात. चंपा षष्ठीचे व्रत केल्याने सुख-शांतीही मिळते आणि मोक्षही प्राप्त होतो. असे मानले जाते की हे व्रत केल्याने मागील जन्माची सर्व पापे धुऊन जातात आणि जीवन सुखी होते. भगवान कार्तिकेय हा मंगळाचा स्वामी आहे. मंगळ ग्रहाला बल देण्यासाठी या दिवशी भगवान कार्तिकेयाचे व्रत करावे. 

चंपा षष्ठी पूजा विधि 

  • भाविक सहा दिवस उपवास करत असतात. भगवान खंडोबाची पूजा करतात. 
  • खंडोबाच्या पूजेकरिता भाविक भगवान खंडोबा देवाला फळे, सफरचंदाचे पान आणि हळद पावडर अपर्ण करत असतात.
  •  सर्व सहा दिवशी सकाळी मंदिरात जाऊन खंडोबाचे दर्शन घ्यावे लागते. 
  • सहावा दिवस हा उपवासाचा शेवटचा दिवस असतो. देवाला अनेक प्रकारचे प्रसाद दाखवले जाते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी