Chanakya Niti for success read in marathi: आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रात मनुष्याच्या जीवानाचे सार आहे. यामध्ये आचार्य चाणक्य यांनी श्लोकांच्यमा माध्यमातून आपले अनुभव आणि ज्ञान सांगितले आहे. आचार्य चाणक्य सांगतात की, माणूस म्हणून जीवन प्राप्त करणाऱ्या प्रत्येकाला आपले आयुष्य यशस्वी करायचे असते. आयुष्यात जास्तीत जास्त सुख-समृद्धी, संपत्ती, वैभव प्राप्त करून आनंदी जीवन जगावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. या यशासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मात्र, यश हे काही ठराविक लोकांनाच मिळते. नीतीशास्त्राच्या 4 श्लोकांमध्ये आयुष्यात यश मिळवण्याचे रहस्य दडलेले आहे. जाणून घ्या कोणते आहेत हे श्लोक. (chanakya 4 shlokas have path for success one who knows it will get prosperity read in marathi)
अधीत्येदं यथाशास्त्रं नरो जानाति सत्तमः ।
धर्मोपदेशं विख्यातं कार्याऽकार्य शुभाऽशुभम् ।।
अर्थ
जो व्यक्ती शास्त्रांच्या नियमानुसार सतत आचरण करत शिक्षण प्राप्त करतो त्या व्यक्तीला योग्य, अयोग्य आणि शुभ-अशुभ यांचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते. अशा व्यक्तीकडे उत्तम ज्ञान असते. म्हणजेच अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यात खूपच सहजपणे यश प्राप्त होते.
हे पण वाचा : भारतातील 'या' रेल्वे स्थानकात भुताटकी? रात्री भटकतात आत्मा?
प्दुष्टाभार्या शठं मित्रं भृत्यश्चोत्तरदायकः ।
ससर्पे च गृहे वासो मृत्युरेव नः संशयः ।।
अर्थ
या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य चाणक्य म्हणतात, दुष्ट पत्नी, खोटारडा मित्र, धूर्त नोकर आणि साप यांच्यासोबत कधीही राहू नये. यांच्यासोबत राहणे म्हणजे, मृत्यूसोबत राहणे आहे.
आपदर्थे धनं रक्षेद्दारान् रक्षेध्दनैरपि ।
नआत्मानं सततं रक्षेद्दारैरपि धनैरपि ।।
अर्थ
मनुष्याला भविष्यात कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. मात्र, या परिस्थितींपासून वाचण्यासाठी त्याने पैशाची बचत करावी. तसेच पत्नीला धोका असल्यास संपत्तीचा त्याग करून तिचे रक्षण केले पाहिजे. पण जर अत्म्याच्या रक्षणाचा प्रश्न आला तर त्याने पैसा आणि पत्नी या दोघांच्याही आधी आत्म्याचे रक्षण केले पाहिजे.
हे पण वाचा : नोरा फतेहीचा डीप नेक बोल्ड ड्रेस, अंदाज पाहून चाहते क्लीन बोल्ड
यस्मिन् देशे न सम्मानो न वृत्तिर्न च बान्धवः ।
न च विद्यागमऽप्यस्ति वासस्तत्र न कारयेत् ।।
अर्थ
आचार्य चाणक्य श्लोकामधून सांगतात, प्रत्येक व्यक्तीला ज्या देशात मान-सन्मान, रोजगाराची संधी आणि मित्र मिळत नाही त्या ठिकाणी राहू नये. तसेच ज्या ठिकाणी ज्ञान नाही तेथे राहू नये.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)