Chanakya Niti: चाणक्य म्हणतात 'हे' व्यक्ती जीवनात होतात अयशस्वी, जाणून घ्या कसं गाठता येतं यशाचं शिखर

आध्यात्म
भरत जाधव
Updated Oct 24, 2022 | 09:16 IST

चाणक्यांनी आपल्या नीतिमध्ये सांगितलं की, कोणते व्यक्ती त्यांच्या जीवनात अपयशी होतात, आणि यश कोणत्या पद्धतीने मिळतं. चाणक्यच्या मते, जीवनातील अपयशांना कधीही घाबरू नये.

Chanakya says these people fail in life
चाणक्य म्हणतात हे व्यक्ती जीवनात होतात अयशस्वी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • यशस्वी आणि अयशस्वी दोन्ही लोकांचे ऐकल्यानंतर, स्वतःच्या बुद्धिमत्तेने विचार करा.
  • जीवनातील अपयशांना कधीही घाबरू नये. एखाद्या व्यक्तीने अपयशातून शिकून आपल्या आयुष्यात पुढे जावे.
  • पराभूत व्यक्तीचा अनुभव निश्चितपणे ऐका, त्यानुसार आव्हानांशी लढण्याची रणनीति बनवा.

Chanakya Niti: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी त्यांच्या नीतिशास्त्र ग्रंथात जीवनाशी संबंधित अनेक गूढ गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य यांची समज आणि दूरदृष्टी यावरुन ओळखता येते की त्यांनी शतकांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजच्या युगातही प्रासंगिक आहेत. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिने चंद्रगुप्त मोर्यला (Chandragupta Maurya) राजाच्या सिंहासनावर बसवलं होतं. चाणक्यांकडे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषयाचे मोठं ज्ञान होतं. चाणक्यांनी त्यांच्या पुढील पिढीचे जीवन सुखकारक बनवता यावे यासाठी चाणक्य नीति लिहिली. त्या नीतिला आपण आत्मसात केलं तरी आपलं जीवन सुखमय होत असते. (Chanakya says these people fail in life, know how to reach the pinnacle of success)

अधिक वाचा  :  T20 क्रिकेटचा नवा बादशाह बनला विराट कोहली

दरम्यान चाणक्यांनी आपल्या नीतिमध्ये सांगितलं की, कोणते व्यक्ती त्यांच्या जीवनात अपयशी होतात, आणि यश कोणत्या पद्धतीने मिळतं. चाणक्यच्या मते, जीवनातील अपयशांना कधीही घाबरू नये. एखाद्या व्यक्तीने अपयशातून शिकून आपल्या आयुष्यात पुढे जावे.  जे अपयशाला घाबरत नाहीत, ते लोक आपल्या आयुष्यात निश्चित यश मिळवतात. 

पराभूत व्यक्तीचा अनुभव न घेणे 

बऱ्याच वेळा लोक अपयशी व्यक्तीबद्दल वेगळा विचार करत असतात, त्यांच्याशी बोलूही इच्छित नाहीत. पण, प्रत्यक्षात त्यांचा अनुभव तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. तुम्ही ज्या मार्गावर जाण्याचा विचार केला होता तो तिथून परत आला आहे. म्हणूनच, पराभूत व्यक्तीचा अनुभव निश्चितपणे ऐका, त्यानुसार आव्हानांशी लढण्याची रणनीति बनवा. त्यापद्धतीने तुम्ही मार्ग काढला तर यश तुम्हाला मिळेल. परंतु जे व्यक्ती अपयशी लोकांचे अनुभव ऐकत नाहीत किंवा त्यांचा प्रवास जाणून घेत नाहीत त्या व्यक्तींनाही जीवनात येत मिळत नाही. 

अधिक वाचा  : कोरोनानंतर आता हवामान बदल बनणार साथीच्या रोगाचे कारण

यशस्वी लोकांकडून सल्ला न घेणं 

ज्यांनी यश मिळवले आहे त्यांच्याशी बोला आणि त्यांचा यशाचा प्रवास समजून घ्या. यामुळे तुमच्यात उत्साह आणि सकारात्मकता वाढेल. अशा लोकांना यशाचा मार्ग समजतो. परंतु जर तुम्ही आपला एकला चलो रे हा गुण ठेवला तर तुम्हाला यश मिळणं कठीण जाईल. 


स्वत:ची समज नसणे 

एखाद्याने त्याची समज कधीच गमावू नये. यशस्वी आणि अयशस्वी दोन्ही लोकांचे ऐकल्यानंतर, स्वतःच्या बुद्धिमत्तेने विचार करा, आपल्या क्षमतेचे मूल्यांकन करा आणि त्यानुसार रणनीति बनवा. प्रत्येकाची बौद्धिक क्षमता आणि परिस्थिती वेगळी असते. म्हणून, आपल्या बुद्धीने पूर्णपणे विचार केल्यानंतरच निर्णय घ्या. हे आवश्यक नाही की जे आव्हान पराभूत झालेल्या व्यक्तीसाठी कठीण होते ते तुमच्यासाठीही कठीण असेल.  परंतु अनेकजण आपली स्वत: समज किंवा क्षमता विसरुन गेलेले असतात. तर आपण काय करू शकतो हे त्यांना माहिती नसते. यामुळे ते यशाच्या जवळ देखील जात नाहीत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी