चाणक्य नीती: आयुष्यात यश हवं तर जीवनात अंमल करा चाणक्यांच्या 'या' तीन उपदेशांचा

आध्यात्म
भरत जाधव
Updated Apr 06, 2021 | 09:28 IST

चाणक्यांच्या मतानुसार यशस्वी नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात.

Chanakya Niti  chanakya these three rules for success
चाणक्य नीती  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • यशस्वी व्यक्ती मर्यादित साधनांमध्येही आपलं ध्येय मिळवतो
  • जीवनात यश तेव्हाच मिळते जेव्हा व्यक्ती योग्य नेतृत्त्वात वेळेवर काम पुर्ण करते
  • चाणक्यांच्या मतानुसार यशस्वी व्यक्तींमध्ये असतात अनेक गुण

नवी दिल्ली : चाणक्यांच्या मतानुसार यशस्वी नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात. या गुणांशिवाय कोणताच व्यक्ती यशस्वी किंवा नेतृत्व करणार होऊ शकत नाही. जीवनात यश तेव्हाच मिळते जेव्हा एक व्यक्ती योग्य नेतृत्त्व म्हणून आपले सर्व कामे वेळेवर पूर्ण करतो. चाणक्यांच्या मतानुसार, एक योग्य व्यक्तीमध्ये असतात हे गुण

वेळ व्यवस्थापनाचा अचूक वापर 

एक चांगला व्यक्ती आणि यशस्वी नेतृत्त्व कर्ता किंवा लीडर बनायचं असेल तर तुमच्याकडे वेळ व्यवस्थापनाची योग्य जाण आणि जागरुकता असली पाहिजे. जो व्यक्ती आपल्या जीवनात वेळेचं महत्व समजतो आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन करतो तोच एक उत्तम नेतृत्त्व बनू शकतो. 

सर्वांसोबत घेऊन जाणारा

आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, ज्या व्यक्ती मध्ये सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा गुण असतो, तो एक चांगला नेतृत्वकर्ता बनत असतो.कोणतेही कार्य पुर्ण करण्यासाठी किंवा यशस्वी करण्यासाठी अनेक लोकांची मदत लागत असते. यासाठी व्यक्तीने आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन चालले पाहिजे. 


नेहमी शिकण्याचा ध्यास

चाणक्यांच्या मते एक चांगलं नेतृत्व कर्ता तोच बनतो जो शिकण्यास कधी संकोच बाळगत नाही. व्यक्तीने नेहमी नवीन वस्तू शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जीवनात प्रगती करायची असेल किंवा यशस्वी होण्यासाठी व्यक्तीने नेहमी शिकत राहिले पाहिजे. जर आपल्या शत्रूकडून काही शिकण्यास मिळत असेल तेही शिकण्याची तयारी असली पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी