शत्रूपेक्षाही धोकादायक असतात 'ही' लोक, यांच्यापासून नेहमी रहा चार पावलं दूर

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी जीवनातील अडचणी टाळण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत. आपल्या आसपास असे काही लोक असतात जे शत्रूपेक्षाही जास्त धोकादायक असतात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर रहावे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • दुष्ट आणि लोभी व्यक्तीला इतरांची प्रगती पहावत नाही
  • स्वार्थी व्यक्तीला आपल्या स्वार्थाच्या व्यतिरिक्त इतर काहीही दिसत नाही

Chanakya Niti News: चाणक्या नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्याचा अवलंब करणारी व्यक्ती नैराश्येतून किंवा दु:खातून दूर होते. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या धोरणांमधून आणि उपाययोजनांमधून प्रेरणा घेत अनेकजण आपल्या आयुष्यात बदल करत असतात. कुठलाही व्यक्ती आपल्या शत्रूपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्या आसपास असे काही लोक असतात जे शत्रूपेक्षाही अधिक धोकादायक ठरु शकतात. अशा लोकांना तुम्ही वेळीच ओळखून त्यांच्यापासून चार हात दूर राहणेच चांगले आहे. (Chanakya Niti for life these people are more dangerous than enemy always away from them read in marathi)

स्वार्थी व्यक्तीपासून दूर रहा

आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, ज्या प्रमाणे एकाधा अंध व्यक्ती काही पाहू शकत नाही. त्याचप्रमाणे स्वार्थी व्यक्तीला आपल्या स्वत:च्या शिवाय उतर काहीही दिसत नाही. त्यामुळे असे लोक नेहमी स्वत:च्या फायद्यासाठी इतरांवर अन्याय करतात इतकेच नाही तर फसवतात सुद्धा. यामुळे अशा व्यक्तींपासून नेहमी दूर राहणे योग्य आहे. अशी व्यक्ती ही तुमच्यावर आणि इतरांवरही आपला वाईट प्रभाव पाडते.

अधिक वाचा : Vastu Tips: झोपताना 'या' दिशेला करु नका पाय, तुमच्या आयुष्यातील काही वर्षे होतील कमी

लालची लोकांपासून दूर रहा

आचार्य चाणक्य सांगतात की, दृष्ट आणि लालची व्यक्तींना दुसऱ्यांची प्रगती पहावत नाही. अशा प्रकारचे लोक हे स्वत:ची प्रगती तर करतच नाहीत उलट इतरांवरही नेहमी टीका करत असतात. त्यामुळे अशा लोकांमुळे इतरांचे नुकसान होते. असे कृत्य करण्यात या व्यक्तींना आनंद वाटतो आणि त्यामुळे अशा लोकांपासून दूर रहा.

क्रोधाची नशा

जो व्यक्ती वासना आणि क्रोधाच्या नशेत असतो अशा व्यक्तीपासून नेहमी दूर रहावे. कारण, अशा व्यक्तीच्या संगतीचा इतरांवरही परिणाम होतो. असे लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कुणाचेही नुकसान करु शकतात. यामुळे अशा लोकांपासून दूर रहा.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी