Chanakya Neeti : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्रामध्ये जीवनाच्या सखोलतेचे वर्णन केले आहे. जीवनात यश त्या लोकांना मिळतं जे वेळसोबत शिस्तीचे आणि नैतिक मूल्यांचे पालन करतात. जिथे शिस्त लोकांना चांगलं आयुष्य कसं जगायचं ते शिकवते तेव्हा वेळ माणसाला वक्तशीर बनवते. जे शिस्तबद्ध राहून आणि वेळेचे महत्त्व समजून काम करतात, ते नेहमीच योग्य दिशेने वाटचाल करतात. अशा लोकांना आपोआप यश मिळू लागते. आचार्य चाणक्य म्हणाले की, ज्यांना वेळेचे आणि शिस्तीचे महत्त्व कळत नाही ते यशस्वी होत नाहीत. आचार्य यांनी अपयशाचे विशेष लक्षण सांगितले आहे.
सकाळी उशीरापर्यंत झोपणे हे आपल्या आरोग्यासाठी आणि कामासाठी चांगले नाही. जो व्यक्ती सूर्याच्या पहिल्या किरणांबरोबर आपल्या झोपेचा त्याग करून उठतो, त्याची सगळी कामे वेळेत पूर्ण होतात. दुसरीकडे जे उशिरा झोपतात त्यांना यश मिळत नाही.
दुसऱ्यांशी कठोरपणे बोलणेही तुमच्या अपयशासाठी कारणीभूत ठरू शकते,असे आचार्य चाणक्य सांगतात. अशी माणसे कडवट जिभेमुळे कोणत्याही कार्यक्षेत्रात यशस्वी होत नाहीत. त्यांना कुटुंबात, कामात आणि समाजातही फक्त अपयशच मिळते. म्हणूनच माणसाने नेहमी सगळ्यांशी प्रेमाने बोलले पाहिजे.
आरोग्याबाबत गंभीर नसणे हे अपयशाचे सर्वात मोठे लक्षण आहे. अशा लोकांना अनेक प्रकारच्या आजारांनी घेरलेले असते. त्यांचा वेळ फक्त रोगावर उपचार करण्यातच जातो. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहिलं पाहिजे.
जी व्यक्ती शिस्तीचे पालन करत नाही, ती आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही. बेशिस्तपणा माणसाला पूर्णपणे उद्ध्वस्त करतो. शिस्त माणसाला यशस्वी बनवते तर बेशिस्तपणा माणसाला नष्ट करतो.