Chanakya Niti : या स्त्रिया असतात घराच्या विनाशाचे कारण! ओळखण्याचा हा आहे सोपा मार्ग

आध्यात्म
भरत जाधव
Updated Aug 24, 2022 | 13:32 IST

जगाला कूटनीती आणि राजकारणाचे (politics) महत्त्वाचे ज्ञान देणाऱ्या आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी कुटुंबाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. नितीशास्त्रात (ethics) आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे भलेही लोकांना कठोर वाटत असली तरी लोकांचे जीवन (life) सुकर करण्याचा योग्य मार्ग दाखवते.

These women are the cause of the destruction of the house
कोणत्या स्त्रियांकडे असतो पैसा, कोण बनतं विनाशाचे कारण?   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हिंदू धर्मात लग्न समारंभाला खूप महत्त्व आहे, असं म्हटलं जातं.
  • लहान मान असलेल्या महिला इतरांवर अवलंबून असतात.
  • ज्या महिलांच्या पायाचे बोट अंगठ्यापेक्षा लांब असते, अशा महिला स्वभावाने खूप क्रोधित असतात

नवी दिल्ली : जगाला कूटनीती आणि राजकारणाचे (politics) महत्त्वाचे ज्ञान देणाऱ्या आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी कुटुंबाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. नितीशास्त्रात (ethics) आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे भलेही लोकांना कठोर वाटत असली तरी लोकांचे जीवन (life) सुकर करण्याचा योग्य मार्ग दाखवते. या उपायांचा अवलंब केल्याने कोणतीही व्यक्ती आपले जीवन आनंदी बनवू शकते. चाणक्य यांनी आपल्या नितीशास्त्रात वृद्ध, वयाने मोठे आणि महिला तसेच लहान मुलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्यांनी नितीशास्त्रात स्त्रियांशी संबंधित असे काही गुण आणि अवगुण सांगितले आहेत, ज्याद्वारे स्त्रिया घराला स्वर्ग बनवू शकते किंवा घराच्या विनाशाचे कारणही बनू शकते.

हिंदू धर्मात लग्न समारंभाला खूप महत्त्व आहे, असं म्हटलं जातं. चाणक्य नीतीमध्ये मैत्र, करिअर, वैवाहिक आयुष्य, पैसा याच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आपली काळजी घेणारा पती किंवा पत्नी मिळाली तर चांगलं असते परंतु जर स्त्री समजून घेणारी नसली तर त्या कुटुंबाचे नुकसान होत असते. 

Read Also : आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कच्ची हळद, जाणून घ्या कसं

आचार्य चाणक्यांनी अशाच काही स्त्रियांविषयी सांगितले आहेत, ज्यांच्यामुळे घराची हेळसांड होत असते. चाणक्य नीतीनुसार, लहान मान असलेल्या महिला इतरांवर अवलंबून असतात, तर ज्या स्त्रियांची मान चार बोटांपेक्षा लांब असते, ती त्यांच्याच संततीच्या नाशाचे कारण बनत असतात. आचार्य चाणक्य यांच्या मते चपटे तळवे असलेल्या महिला आयुष्यभर सुख आणि संपत्तीपासून वंचित राहतात. पिवळे डोळे असलेल्या महिलेचे आरोग्य चांगले नसते.

Read Also : Govt Jobs: JEE Mainsपरीक्षा दिली ना; मग लेका आर्मीत जा की!

तर, राखाडी डोळे असलेल्या स्त्रियांना खूप चांगले मानले जाते. जर एखाद्या स्त्रीच्या कानात जास्त केस असतील तर ते घरातील दुःखाचे कारण बनतात. याशिवाय पसरलेले दात असलेल्या स्त्रियांच्या जीवनात नेहमीच दु:ख असतात. ज्या महिलांच्या पायाचे बोट अंगठ्यापेक्षा लांब असते, अशा महिला स्वभावाने खूप क्रोधित असतात आणि त्यांना नियंत्रित करणे खूप कठीण असते.

(Disclaimer: येथे दिलेली सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी