Chanakya Niti: मागील जन्मातील कार्यांमुळे ठरत असतो वर्तमानकाळ; ही पुण्याची कामे केल्यास सुधारतो पुढचा जन्म

आध्यात्म
Updated Jun 18, 2022 | 14:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chanakya Niti For Life | नीतीशास्त्रात आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, वर्तमानात माणसाला जे सुख आणि दु:ख मिळते ते मागील जन्मात केलेल्या कर्माचे फळ असते. एखाद्या व्यक्तीने मागील जन्मात केलेल्या कर्मानुसार त्याचे भाग्य लिहिले जाते.

current life is determined by the good deeds of the previous life
मागील जन्मातील कार्यांमुळे ठरत असतो वर्तमानकाळ, वाचा सविस्तर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मागील जन्मातील कार्यांमुळे ठरत असतो वर्तमानकाळ.
  • पुण्याची कामे केल्यास सुधारतो पुढचा जन्म.
  • आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीला चांगले अन्न मिळणे हे चांगल्या आयुष्याचे लक्षण आहे.

Chanakya Niti For Life | मुंबई : नीतीशास्त्रात आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, वर्तमानात माणसाला जे सुख आणि दु:ख मिळते ते मागील जन्मात केलेल्या कर्माचे फळ असते. एखाद्या व्यक्तीने मागील जन्मात केलेल्या कर्मानुसार त्याचे भाग्य लिहिले जाते. म्हणून माणसाने आपले जीवन सत्कर्मात वाहून घेतले पाहिजे असे बोलले जाते. आचार्य चाणक्य यांनी मनुष्याचे कर्म आणि जीवन याविषयी सविस्तरपणे माहिती सांगितली आहे. चाणक्य नीतीच्या दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात त्यांनी सहा प्रकारचे सुख सांगितली आहेत जी प्रत्येकाला मिळत नाहीत. हे सुख मागील जन्मात केलेल्या कर्माच्या आधारेच ठरत असते. (current life is determined by the good deeds of the previous life). 

अधिक वाचा : 35 मार्क्स की अहमियत तुम क्या जानो स्कॉलरबाबू!


भोज्यम् अन्न शक्तिश्च रतिशक्ती वरांगना ।

विभावो दानशक्तिश्च नल्पस्य तपसः फलम्

चांगले जेवण 

आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीला चांगले अन्न मिळणे हे चांगल्या आयुष्याचे लक्षण आहे. हे सुख फक्त त्या भाग्यवान मंडळींनाच मिळते, ज्यांनी मागील जन्मी इतर लोकांचे पोट भरले आहे. हे चांगल्या कर्माचे फळ आहे.


चांगली पचन शक्ती 

आचार्य चाणक्य म्हणतात की फक्त चांगले अन्न मिळणे म्हणजे सगळं काही मिळत नाही. कारण ते खाल्लेले चांगले अन्न पचवण्याची ताकदही माणसामध्ये असायला हवी. कधी-कधी लोकांना चांगले अन्न मिळते, पण ते खाण्याची इच्छा असूनही ते खाऊ शकत नाहीत. अनेक रोगांमुळे माणसामध्ये चांगले अन्न खाण्याची क्षमता नसते. ते लोक खूप भाग्यवान असतात ज्यांच्याकडे अन्न पचवण्याची क्षमता असते.

चांगला जीवनसाथी 

चाणक्य नीतीनुसार, एक संस्कारी आणि गुणवान जीवनसाथी मिळणे हा कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो. ज्यांच्याकडे बुद्धिमान आणि गुणवान जोडीदार असतो ते भाग्यवान असतात. पूर्वजन्मातील चांगल्या कर्मामुळेच ते प्राप्त होते. पूर्वजन्मात स्त्रीचा अपमान करणाऱ्यांचे वैवाहिक जीवन नेहमीच संकटात असते असे शास्त्रात सांगितले आहे.

दान करण्याची क्षमता 

आचार्य चाणक्य म्हणतात की कलियुगात धनवानांची कमतरता नाही, परंतु दान करण्याचा गुण अशा लोकांमध्ये आहे ज्यांनी पूर्वीच्या जन्मी सत्कर्म करून इतरांचे भले करण्याचा विचार केला आहे. फक्त अशाच लोकांमध्ये दानधर्म करण्याची क्षमता आणि ताकद असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी