Daily Horoscope : राशीभविष्य : बुधवार, २७ ऑक्टोबर २०२१, जाणून घ्या ऑक्टोबरच्या शेवटच्या बुधवारचे भविष्य

Daily Horoscope राशी भविष्य, २७ ऑक्टोबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Daily rashi bhavishaya 27 october 2021 daily horoscope
राशीभविष्य : बुधवार, २७ ऑक्टोबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ​मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: व्यवसायात चांगले यश मिळेल. नोकरीबाबत निर्णय घेताना त्रास होईल.
  • कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: तब्येतीबाबत सावध राहा. नोकरी बदलण्याचा विचार कराल
  • धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: नोकरी आणि व्यसायासाठी दिवस उत्तम आहे.

आजचे राशी भविष्य २७ ऑक्टोबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? (Daily rashi bhavishaya 27 october 2021 daily horoscope )

मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: व्यवसायात चांगले यश मिळेल. नोकरीबाबत निर्णय घेताना त्रास होईल. आरोग्याबाबत प्रसन्नता राहील, पण थोडासा निष्काळजीपणा नंतर त्रास देऊ शकतो. गुळाचे दान करा. शुभ रंग - लाल.

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मार्ग उपलब्ध होतील, आपल्या कामाच्या योजना विस्तारतील. वाहन खरेदी करण्याचा निर्णय घ्या. एखाद्या गरिबाला पांढरे वस्त्र दान करा. मिथुन आणि सिंह राशीचे सहकार्य घ्या. शुभ रंग - निळा.

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: व्यवसायाला नवी दिशा द्याल. विद्यार्थ्यांना सफलता मिळेल. आपल्या मनात काही निर्णयांबाबत संभ्रम राहील. शुभ रंग - पिवळा.

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: नोकरीत चांगले यश मिळण्यासोबतच नव्या प्रकल्पाचे कार्य सुरू होईल. गरज नसलेल्या समस्यांसध्ये व्यस्त राहाल. स्वास्थ्यसुखाने प्रसन्न राहाल. शुभ रंग - हिरवा.

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: व्यवसायात चांगले यश मिळेल. पैशाच्या देवाणघेवाणीचे संकेत आहेत. दिवस धार्मिक कार्यांमध्ये संलग्नतेचा आहे. शंकराचा आशीर्वाद घ्या. शुभ रंग - तपकिरी.

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: तब्येतीबाबत सावध राहा. नोकरी बदलण्याचा विचार कराल. रखडलेले काम पूर्ण झाल्याने खूश राहाल. कुंभ किंवा मकर राशीच्या लोकांकडून लाभ होईल. गणपतीला दुर्वा वाहा. शुभ रंग - पांढरा.

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: व्यवसायात संघर्ष आहे, पण नवीन संधी मिळतील. घरी हनुमानाला तीन प्रदक्षिणा घाला. मित्रांची मदत घ्या. शुभ रंग - आकाशी.

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: व्यवसायात आपली स्वप्ने विस्तारतील. नोकरीत चांगले यश मिळेल. अन्नदान करा. वाहन खरेदीचा योग संभवतो. शुभ रंग - गडद लाल.

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: नोकरी आणि व्यसायासाठी दिवस उत्तम आहे. चांगल्या कामात पैसे खर्च होतील. नोकरीत चांगले यश मिळेल. सिंह राशीच्या लोकांकडून लाभ होईल. शुभ रंग - मोरपंखी.

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: नोकरीत चांगल्या संधी उपलब्ध होतील. व्यवसायातही चांगले यश मिळेल. नोकरीला नवी दिशा द्याल. हनुमानाची पूजा करा. धनलाभ होऊ शकतो. शुभ रंग - गडद निळा.

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: आरोग्याकडे लक्ष द्या. तूळ राशीचे लोक लाभदायक ठरू शकतात. आपली नवीन व्यावसायिक योजना यशस्वी होईल. तिळाचे दान करा. हनुमानाचा आशीर्वाद घ्या. शुभ रंग - जांभळा.

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. पैसे गुंतवण्याचा विचार कराल. मेष आणि सिंह राशीचे लोक आपली साथ देतील. अन्नदान करा. शुभ रंग - लाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी