Darsh Amavasya 2022 : कधी आहे आहे दर्श अमावस्या, 'या' दिवशी काय केल्याने होईल फायदा

When is Darsh Amavasya, what to do on this day will be beneficial : कार्तिक महिन्यातील अमावस्या अर्थात दर्श अमावस्या बुधवार 23 नोव्हेंबर 2022 रोजी आहे.

When is Darsh Amavasya
Darsh Amavasya 2022 : कधी आहे आहे दर्श अमावस्या  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • Darsh Amavasya 2022 : कधी आहे आहे दर्श अमावस्या, 'या' दिवशी काय केल्याने होईल फायदा
 • अमावस्या म्हणजे काय?
 • दर्श अमावस्या म्हणजे काय?

When is Darsh Amavasya, what to do on this day will be beneficial : कार्तिक महिन्यातील अमावस्या अर्थात दर्श अमावस्या बुधवार 23 नोव्हेंबर 2022 रोजी आहे. या दिवशी पवित्र नदीत आंघोळ करून पूर्वजांना जलाभिषेक करतात. पिंडदान, श्राद्धविधी करतात. यामुळे पितृदोषातून मुक्ती मिळते असे ज्योतिषशास्त्र सांगते. अमावस्येला कालसर्प दोषातून मुक्त होण्यासाठीचे विधी पण केले जातात. 

जर आपल्या घराजवळ पवित्र नदी नसेल तर असेल त्या नदीवर आंघोळ करून अथवा नदीचे पाणी घरच्या आंघोळीच्या पाण्यात मिसळून त्या पाण्याने आंघोळ करावी. आंघोळ केल्यानंतर पितृदोषातून मुक्त होण्यासाठी आवश्यक ते विधी करावेत.

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

Name Astrology : 'या' नावांच्या मुलांचा मेंदू कॉम्प्युटरपेक्षा वेगाने काम करतो

Tulsi for Prosperity: लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी करा तुळशीशी संबंधित हे सोपे उपाय...होईल धनप्राप्ती

अमावस्या म्हणजे काय? दर्श अमावस्या म्हणजे काय?

पृथ्वीवरून जर रात्री चंद्र दिसला नाही तर त्या तिथीला अमावस्या म्हणतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असलेल्या अमावास्येला सिनीवाली अमावास्या म्हणातात. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या काळात अंशतः चतुर्दशी व अंशतः अमावास्या असेल तर त्या अमावास्येला दर्श अमावास्या, आणि अंशतः अमावास्या व अंशतः प्रतिपदा असेल तर कुहू अमावास्या म्हणतात. 

 1. अमावस्या तिथी प्रारंभ : बुधवार 23 नोव्हेंबर 2022, सकाळी 6.53
 2. अमावस्या तिथी समाप्ती : गुरुवार 24 नोव्हेंबर 2022, मध्यरात्री 4.26
 3. सूर्योदय : बुधवार 23 नोव्हेंबर 2022, सकाळी 6.50
 4. सूर्यास्त : बुधवार 23 नोव्हेंबर 2022, संध्याकाळी 5.59
 5. चंद्रोदय : 4.03
 6. चंद्र रास : तूळ
 7. स्नान काळ : सूर्योदयापासून सुरू

अमावस्येला पुण्यप्राप्तीसाठी करायच्या कृती

 1. पवित्र नदीत आंघोळ करून पूर्वजांना जलाभिषेक करावा. पिंडदान, श्राद्धविधी करून पितृदोषातून मुक्त व्हावे.
 2. कालसर्प दोष असल्यास या दोषातून मुक्त होण्यासाठीचे विधी करावेत. 
 3. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यावे.
 4. यथाशक्ती गरजूंना दान करावे.
 5. अन्नदान करावे, गरीबांना कपडे तसेच अंथरूण-पांघरूण दान करावे.
 6. विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत अथवा वही-पुस्तके, शैक्षणिक साहित्य अशा स्वरुपात मदत करावी.
 7. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांची सेवा करावी.
 8. चांगला विचार करणे, चांगली कृती करणे या पद्धतीने पुण्य कर्म करावे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी