Datta Jayanti Lessons Of 24 Gurus : दत्तजयंती निमित्त दत्ताच्या २४ गुरुंकडून घेऊ बोध, पृथ्वीसारखे सहनशील आणि आकाशासारखे एकसमान व्हावे

Datta Jayanti Lessons Of 24 Gurus Of Lord Dattatreya, Be Tolerant Like The Earth, Be The Same As The Sky : भगवान दत्तात्रेय यांचे २४ गुरु होते. या सर्व गुरुंकडून त्यांनी काही ना काही बोध घेतले. आज दत्तजयंती निमित्त २४ गुरुंकडून भगवान दत्तात्रेय यांनी घेतलेले बोध आपणही जाणून आणि उमजून घेण्याचा प्रयत्न करू. 

Datta Jayanti Lessons Of 24 Gurus Of Lord Dattatreya, Be Tolerant Like The Earth, Be The Same As The Sky
दत्तजयंती निमित्त दत्ताच्या २४ गुरुंकडून घेऊ बोध 
थोडं पण कामाचं
 • दत्तजयंती निमित्त दत्ताच्या २४ गुरुंकडून घेऊ बोध
 • पृथ्वीसारखे सहनशील आणि आकाशासारखे एकसमान व्हावे
 • बालकाप्रमाणे परिस्थिती कशीही असली तरी कायम चिंतामुक्त आणि आनंदी राहावे

Datta Jayanti Lessons Of 24 Gurus Of Lord Dattatreya, Be Tolerant Like The Earth, Be The Same As The Sky : आज शनिवार १८ डिसेंबर २०२१, मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्तजयंती. भगवान दत्तात्रेय (भगवान दत्तात्रय) हे भगवान विष्णूच्या २४ अवतारांमधील सहावा अवतार. महाराज दत्तात्रेय आयुष्यभर ब्रह्मचारी, अवधूत आणि दिगंबर होते. भगवान दत्तात्रेयांच्या पूजेमध्ये अहंकार सोडून जीवनाला ज्ञानाने यशस्वी करण्याचा संदेश देण्यात आला आहे. भगवान दत्तात्रय (भगवान दत्तात्रेय) हे ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे अवतार. दत्तजयंतीला त्रिमूर्तींची पूजा करतात. भगवान दत्तात्रेय हे सृष्टीचे रचनाकार ब्रम्हदेव, पालनकर्ते विष्णू आणि लय करणारे भगवान शंकर यांच्या रूपात महेश यांचं स्वरूप मानलं जातं. यामुळे दत्तात्रेयाची उपासना ही उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन शक्तीची उपसना असं म्हणतात. यंदा आज (शनिवार १८ डिसेंबर २०२१, मार्गशीर्ष पौर्णिमा) मार्गशीर्ष पौर्णिमेची सुरूवात सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी होईल आणि रविवार १९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजून ६ मिनिटांनी मार्गशीर्ष पौर्णिमा संपणार आहे. दत्त भक्त या वेळेत दत्त जयंती साजरी करू शकतात.

भगवान दत्तात्रेय यांचे २४ गुरु होते. या सर्व गुरुंकडून त्यांनी काही ना काही बोध घेतले. आज दत्तजयंती निमित्त २४ गुरुंकडून भगवान दत्तात्रेय यांनी घेतलेले बोध आपणही जाणून आणि उमजून घेण्याचा प्रयत्न करू. 

 1. पृथ्वी - सर्व चांगल्या-वाईट प्राणीमित्रांचा भार सहन करणाऱ्या आणि असंख्य प्रहार झेलणाऱ्या पृथ्वीप्रमाणे सहनशील व्हा. 
 2. पिंगळा वेश्या - पिंगळा नावाच्या वेश्येत वैराग्य भावना जागृत झाली. हे पाहून पैशांमध्ये नाही तर परमात्म्याच्या चिंतनात सुख सामावले आहे; हा बोध भगवान दत्तात्रेय यांनी घेतला.
 3. कबुतर - मुलं जाळ्यात अडकल्याचे पाहून स्वतःला जाळ्यात अडकवून घेणारी कबुतराची जोडी पाहून मोह दुःखाचे कारण ठरते हा बोध भगवान दत्तात्रेय यांनी घेतला.
 4. सूर्य - सूर्य एक आहे पण वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळा दिसतो तसेच आत्मा एक आहे पण वेगवेगळ्या माध्यमांमुळे वेगवेगळा दिसतो.
 5. वायू - परिसर चांगला असो वा वाईट वायू आपला वाहण्याचा गुणधर्म बदलत नाही तशाच पद्धतीने चांगल्या अथवा वाईट लोकांची साथ लाभली तरी आपण आपला गुणधर्म बदलू नये.
 6. हरिण - मौजमजेच्या नादात बेसावध राहिल्यामुळे हरिणाचा मृत्यू झाला, सिंहाने त्याची शिकार केली. हे पाहून मौजमजेच्या नादात बेसावध राहू नये नाहीतर अडचणी वाढू शकतात हा बोध भगवान दत्तात्रेय यांनी घेतला.
 7. समुद्र - समुद्र जसा भरती-ओहोटी आली तरी थांबत नाही त्याचे लाटांवर लाटा निर्माण करण्याचे आणि सर्व चांगल्या-वाईट गोष्टी सामावून घेण्याचे कार्य सुरू ठेवतो तसेच आयुष्यात कसेही प्रसंग आले तरी थांबू नये, आपले कार्य सुरू ठेवावे हा बोध भगवान दत्तात्रेय यांनी घेतला.
 8. पतंग - पतंग दिव्याकडे आकर्षित होतो आणि जळून जातो, यातून हा बोध घ्यावा की मोहात अडकल्यास नुकसान होते.
 9. हत्ती - हत्ती हत्तीणीच्या संपर्कात आला तर सारं काही विसरुन तिला रिझवण्यात अडकतो. यातून भगवान दत्तात्रेय यांनी हा बोध घेतला की संन्याशाने कोणत्याही मोहात पडू नये. पुरुष संन्याशाने महिलेपासून तर महिला संन्याशाने पुरुषापासून अंतर राखावे. संन्यस्त आयुष्य, जप-तप, ध्यान-चिंतन-मनन यावर लक्ष केंद्रीत करावे.
 10. आकाश - कोण कसेही असो आणि कसेही वागो त्याच्यासाठी डोक्यावर असणारे आकाश एकसमान असते. तसेच आपण लोकांशी चांगले वागावे. भेदाभेद करणे टाळावे.
 11. जल (पाणी) - कायम पवित्र राहावे.
 12. पोळ्यातून मध काढणारा - मधमाश्या मध गोळा करुन पोळ्यात ठेवतात आणि एक दिवस पोळ्यातून मध काढणारा सगळा मध घेऊ जातो. यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त संचय करू नये नाहीतर दुसरा येऊन ते घेऊन जाईल.
 13. मासा - मासा काट्याला लावलेल्या खाण्याच्या पदार्थाच्या मोहात अडकून स्वतःचा जीव गमावतो. यातून मोहात अडकून स्वतःचे नुकसान करुन घेऊ नये हा बोध भगवान दत्तात्रेय यांनी घेतला.
 14. क्रौंच पक्षी - क्रौंच पक्षी मांसाचा तुकडा चोचीत धरुन ठेवतो पण लगेच खात नाही. हे पाहून समोरुन एक बलवान पक्षी येतो आणि क्रौंचाच्या चोचीतला मांसाचा तुकडा खेचून घेतो आणि खातो. यातून सर्व काही आपल्या जवळ ठेवण्याचा विचार सोडून देण्याचा बोध भगवान दत्तात्रेय यांनी घेतला. त्याग भावना जागृत केली.
 15. बालक - परिस्थिती कशीही असली तरी कायम चिंतामुक्त आणि आनंदी राहावे.
 16. आग - आग समोरचे भस्म करते त्यात फरक करत नाही त्याप्रमाणे परिस्थिती बदलली म्हणून आपण आपला प्रामाणिकपणा सोडू नये. कर्तव्य पूर्ण करणे थांबवू नये.
 17. चंद्र - पृथ्वीवरुन चंद्राचा आकार दररोज बदलताना दिसतो पण चंद्राच्या शीतलतेत बदल होत नाही त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थिती आत्मा बदलत नाही.
 18. कुमारिका - धान्य कुटताना हातातल्या बांगड्यांचा किणकिणाट त्रासदायक वाटत होता आणि बांगड्या फुटण्याच्या काळजीपोटी कामाचा वेग मंदावला होता. अखेर कुमारिकेने दोन्ही हातात एक-एक बांगडी राहू दिली आणि धान्य कुटण्याचे काम शांतपणे सुरू ठेवले. इतर बांगड्यांचा त्याग केला. त्याप्रमाणेच शांतपणे कार्य करत राहावे.
 19. बाण तयार करणारा - शेजारुन राजाची स्वारी गेली तरी बाण तयार करणारा विचलीत झाला नाही. तो शांतपणे त्याचे काम करत होता. याच पद्धतीने आपले कार्य विचलीत न होता शांतपणे करत राहावे.
 20. साप - संन्याशाने एकाकी राहावे आणि जागोजागी ज्ञान देत जावे.
 21. कोळी - कोळी जसा मोठे जाळे तयार करुन त्याच्या केंद्रस्थानी राहतो आणि नंतर स्वतःच ते जाळे गिळून टाकतो तसेच भगवंताने त्याच्या मायेने निर्माण केलेली सृष्टी तो त्याच्या इच्छेनुसार कधीही गिळून टाकू शकतो (सृष्टी स्वतःमध्ये सामावून घेऊ शकतो). 
 22. किडा - आपल्या विचारानुसार आपले वर्तन असते हा बोध भगवान दत्तात्रेय यांनी किड्याकडून घेतला.
 23. भोवरा आणि मधमाशी - भोवरा आणि मधमाशी उत्तमोत्तम फुलांतून परागकण घेतात त्या पद्धतीने चांगले तेवढे ग्रहण करत जावे.
 24. अजगर - भूक नसेल तर अजगर सुस्त पडून राहतो तसे शांत समाधानी राहिले तर सुखी होता येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी