Datta Jayanti 2021 Wishes : १८ डिसेंबरला आहे दत्त जयंती, जाणून घ्या पौर्णिमा आणि मार्गशीर्षाची वेळ

Dattatreya Jayanti Datta Jayanti Marathi Wishes Share on Facebook Instagram Whatsapp Twitter Telegram and other social media platforms : मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला. म्हणून या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. अनसूयेस अत्री ऋषीपासून भगवान दत्तात्रेयचा जन्म झाला असे सांगतात

Datta Jayanti 2021 in Marathi, Datta Jayanti 2021 Marathi wishes
१८ डिसेंबरला आहे दत्त जयंती, जाणून घ्या पौर्णिमा आणि मार्गशीर्षाची वेळ 
थोडं पण कामाचं
  • १८ डिसेंबरला आहे दत्त जयंती, जाणून घ्या पौर्णिमा आणि मार्गशीर्षाची वेळ
  • मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्तात्रेय यांचा जन्म
  • अनसूयेस अत्री ऋषीपासून भगवान दत्तात्रेयचा जन्म झाला

Dattatreya Jayanti Datta Jayanti Marathi Wishes Share on Facebook Instagram Whatsapp Twitter Telegram and other social media platforms । मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला. म्हणून या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. अनसूयेस अत्री ऋषीपासून भगवान दत्तात्रेयचा जन्म झाला असे सांगतात. सर्वसाधारणपणे तो विष्णूचा अवतार मानला जातो. मार्कंडेयपुराणातील त्याच्या वर्णनावरून तो मूलतः शाक्त तांत्रिक देव असावा, असे दिसते. त्रिपुरा रहस्यात मदिरा व मदिराक्षीसमवेत रंगलेला दत्तात्रेय आढळतो. वेद, कर्मकांड व चातुर्वर्ण्य यांचे विष्णूने दत्तावतारात पुनरुज्जीवन केल्याचे ब्रह्मपुराणात म्हटले आहे. शंकर हा दत्ताचा गुरू असल्याचाही तेथे निर्देश आहे. भागवतात अवधूतांचे चोवीस गुरू सांगितले आहेत. पुढे हेच चोवीस गुरू दत्तात्रेयाचेही गुरू म्हणून ओळखले जाऊ लागले व दत्तचरित्रातही ते कायमचे प्रविष्ट झाले. शांडिल्योपनिषद, जाबालदर्शनोपनिषद  व दत्तात्रेयोपनिषद  यांतही दत्तात्रयाचे माहात्म्य वर्णिले आहे.

यंदा १८ डिसेंबर शनिवारी दत्त जयंती साजरी होणार आहे.  १८ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेची सुरूवात सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी सुरू होणार आहे. तर १९ डिसेंनर सकाळी १० वाजून ६ मिनिटांनी मार्गशीर्ष पौर्णिमा संपणार आहे. दत्त भक्त या वेळेत दत्त जयंती साजरी करू शकतात.

औदुंबर वृक्षाखाली दत्तात्रेयाचा वास असतो ह्या समजुतीमुळे हा वृक्ष पवित्र मानतात. दत्तात्रेयाविषयी नाथ, महानुभाव व वारकरी या संप्रदायांत नितान्त आदर व श्रद्धाभाव आहे. दत्तात्रेय हा योग व तंत्रमार्गातील आचार्य वा योगीराज मानला जातो. अवधूतोपनिषद  व जाबालदर्शनोपनिषद  या ग्रंथांतील बोध प्रत्यक्ष दत्तप्रणीत असल्याचे ह्या उपनिषदांत म्हटले आहे. अवधूतगीता, त्रिपुरोपास्तिपद्धति  व परशुरामकल्पसूत्रम्  हे ग्रंथ दत्तप्रणीत मानले जातात. यांतील पहिला ग्रंथ सांप्रदायिक असून उर्वरित दोन ग्रंथ तंत्रविषयक आहेत. दत्तात्रेयाचे एकाक्षरी, षडक्षरी अष्टाक्षरी, द्वादशाक्षरी व षोडशाक्षरी मंत्र असून ‘दत्तगायत्री’ नावाचाही एक मंत्र आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी