Datta Aarti in marathi : पूर्वजांना मुक्त करणाऱ्या श्री दत्त देवाची कशी साजरी कराल जयंती आणि आरती जाणून घ्या

आध्यात्म
भरत जाधव
Updated Dec 06, 2022 | 20:58 IST

दत्त देवाची (Datta Deva) पूजा (Worship) केल्याने आपल्या पितरांची मुक्ती होत असते. महाराष्ट्रासह (Maharashtra) इतर राज्यातही दत्त देवाचा हा उत्सव (celebration) साजरा केला जातो.  या सणाच्या दिवशी ठिक-ठिकाणी जयंती साजरी करण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी दत्त यज्ञाचे आयोजन केले जाते.

how to celebrate Dutt Jayanti Puja time & Vidhi
Dutta Jayanti 2022:श्री दत्त देवाची कशी साजरी कराल जयंती आणि आरती जाणून घ्या  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • काही ठिकाणी दत्त यज्ञाचे आयोजन केले जाते.
  • दत्त जयंतीच्या दिवशी दत्त नामाचा जप आणि पूजा वगैरे केल्याने आपल्याला फायदा होत असतो.
  • महाराष्ट्रातील औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर आदी ठिकाणी या सणाला विशेष महत्त्व आहे.

Datta Jayanti aarti lyrics in marathi: मुंबई : श्री दत्तात्रेय (Dattatreya) किंवा दत्त जयंती दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. मार्गशीर्ष (Margashirsh) पौर्णिमेच्या (full moon)संध्याकाळी मृग नक्षत्रात दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी सर्व दत्तक्षेत्रात दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त देवाची पूजा केल्याने आपल्या पितरांची मुक्ती होत असते. महाराष्ट्रासह (Maharashtra) इतर राज्यातही दत्त देवाचा हा उत्सव साजरा केला जातो.  या सणाच्या दिवशी ठिक-ठिकाणी जयंती साजरी करण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी दत्त यज्ञाचे आयोजन केले जाते. तर काही ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक गुरुचरित्राचे पठण करतात. यावरून दत्त जयंतीचे  महत्त्व अधोरेखित होते. (Dattatreya Aarati Jayanti 2022  how to celebrate Datta Jayanti Puja time and Vidhi Aarti)

दत्त देवाच्या नामस्मरणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.  प्रस्तुत लेखात दत्त देवतेचा इतिहास आणि दत्त जयंती साजरी करण्याविषयी माहिती आपण या लेखात घेणार आहोत..

दत्त जयंतीचे महत्त्व

दत्तजयंतीच्या दिवशी दत्त तत्व पृथ्वीवर सामान्यपेक्षा 1000 पट जास्त सक्रिय असते. या दिवशी दत्त नामाचा जप वगैरे पूजा केल्याने दत्त तत्वाचा जास्तीत जास्त फायदा होतो. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त नामाचा जप आणि पूजा वगैरे केल्याने आपल्याला फायदा होत असतो. दरम्यान दत्त जयंती साजरी करण्याची कोणतीही शास्त्रविशिष्ट पद्धत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पठण करण्याची प्रथा आहे. याला गुरुचरित्र सप्ताह म्हणतात. भजन, उपासना आणि विशेषतः कीर्तन इत्यादी  प्रकारे भाविक दत्त देवाची प्रार्थना करत असतात.  

अधिक वाचा  :पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून का ओळखतात?

महाराष्ट्रातील औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर आदी ठिकाणी या सणाला विशेष महत्त्व आहे. तमिळनाडूतही दत्त जयंती साजरी केली जाते. काही ठिकाणी या दिवशी दत्त यज्ञ केला जातो. दत्त यज्ञामध्ये, पवमान पंचसूक्त आवृत्ती (जप) आणि त्याचा दशमांश किंवा एक तृतीयांश तूप आणि तीळ घालून हवन केले जाते.  दत्त यज्ञासाठी किती नामजप करावयाचे हे निश्चित नाही. स्थानिक पुजाऱ्यांच्या आज्ञेनुसार जप आणि हवन केले जातात.
अ‍धिक वाचा : गुजरातमध्ये मोदी लाट कायम; काँग्रेसला झटका तर आपचा सुपडा साफ

जाणून घ्या दत्ताची आरती 

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥

जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥

दत्त देवाची आरती वाचा पीडीएफमध्ये

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी