मुंबई - मार्गशीर्ष (Margashirsha)पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. यंदा दत्त जंयती (Dutt Jayanti)7 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. देव-देवतांच्या काळात भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या (Lord Brahma)आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’म्हणून साजरा केला जातो. (Dattatreya God History , Significance: Dattatreya God has 108 names, know what these names mean)
भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधणेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.
दत्त जयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते. परंतु दत्तजयंती साजरी करण्यासंबंधी शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. या जयंतीच्या दिवशी दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात.
दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसादाचे वाटप केले जाते. महाराष्ट्रात हिंदूच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्रीदत्तप्रभुची उपासना करतात. मुसलमान 'फकिर' म्हणून पूजत असतात. सर्व धर्मात पूजा होत असलेल्या दत्तांची 108 नावे आहेत, ही नावे काय आहेत त्यांचा अर्थ काय हे आपण जाणून घेणार आहोत...
दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’ याची अनुभूती देणारा.प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक जण चालतो, बोलतो आणि हसतो.
जो अहं धुतो, तो अवधूत! अभ्यासकरतांना आपल्या मनावर ताण येतो ना? खरेतर अभ्यास करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण अभ्यास करणारा मी आहे,असे वाटल्याने ताण येतो. हाच आपला अहंकार आहे.
दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहे असा ! जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर. जर ही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्य जिवांनी त्याला शरणच जायला हवे.
गाय : दत्ताच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी मानले जाते. कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनू आपणाला जे हवे, ते सर्व देते. पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात.
चार कुत्रे : हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४ वेदांचे प्रतीक आहेत.
औदुंबर वृक्ष : दत्ताचे पूजनीय रूप ! या वृक्षात दत्त तत्त्व अधिक आहे.
ॐ श्री दत्ताय नमः
ॐ श्री देवदत्ताय नमः
ॐ श्री ब्रह्मदत्ताय नमः
ॐ श्री विष्णुदत्ताय नमः
ॐ श्री शिवदत्ताय नमः
ॐ श्री अविदत्ताय नमः
ॐ श्री आत्रेयाय नमः
ॐ श्री अत्रिवरदाय नमः
ॐ श्री अनसूयाय नमः
अधिक वाचा : महाविकास आघाडीकडून महामोर्चाची हाक, 17 डिसेंबरला महामोर्चा
ॐ श्री अनसूयासूनवे नमः
ॐ श्री अवधूताय नमः
श्री धर्माय नमः
ॐ श्री धर्मपरायणाय नमः
ॐ श्री धर्मपतये नमः
ॐ श्री सिद्धाय नमः
ॐ श्री सिद्धिदाय नमः
ॐ श्री सिदधिपतये नमः
ॐ श्री धर्मपतये नमः
ॐ श्री सिद्धाय नमः
ॐ श्री सिद्धिदाय नमः
ॐ श्री सिदधिपतये नमः
ॐ श्री सिद्धिसेविताय नमः
ॐ श्री गुरवे नमः
ॐ श्री गुरुगम्याय नमः
ॐ श्री गुरोर्गुरुतराय नमः
अधिक वाचा : पुण्यात मनसेत फुट, वसंत मोरे यांना राष्ट्रवादीची ऑफर
ॐ श्री गरिष्ठाय नमः
ॐ श्री वरिष्ठाय नमः
ॐ श्री महिष्ठाय नमः
ॐ श्री महात्मने नमः
ॐ श्री योगाय नमः
ॐ श्री योगगम्याय नमः
ॐ श्री योगादेशकराय नमः
ॐ श्री योगपतये नमः
ॐ श्री योगीशाय नमः
ॐ श्री योगाधीशाय नमः
ॐ श्री योगपरायणाय नमः
ॐ श्री योगिध्येयांधिपंकजाय नमः
ॐश्री दिगंबराय नमः
ॐश्री दिव्यांबराय नमः
ॐ श्री पीतांबराय नमः
ॐ श्री श्वेतांबराय नमः
ॐ श्री चित्रांबराय नमः
ॐ श्री बालाय नमः
ॐ श्री बलवीर्याय नमः
ॐ श्री कुमाराय नमः
ॐ श्री कंदर्पमोहनाय नमः
अधिक वाचा : सीमाप्रश्नी शिंदे सरकारचे पाऊल पडते मागे
ॐ श्री अर्धांगालिंगितांगनाय नमः
ॐ श्री सुरागाय नमः
ॐ श्री विरागाय नमः
ॐ श्री वीतरागाय नमः
ॐ श्री अमृतवर्षिणे नमः
ॐ श्री उग्राय नमः
ॐ श्री अनुग्ररूपाय नमः
ॐ श्री स्थविराय नमः
ॐ श्री स्थवीयसे नमः
ॐ श्री शांताय नमः
ॐ श्री अघोराय नमः
ॐ श्री उर्ध्वरेतसे नमः
ॐ श्री एकवक्त्राय नमः
ॐ श्री अनेकवक्त्राय नमः
ॐ श्री द्विनेत्राय नमः
ॐ श्री त्रिनेत्राय नमः
ॐ श्री त्रिनेत्राय नमः
ॐ श्री द्विभुजाय नमः
अधिक वाचा :मुंबईत मालाडच्या मालवणी परिसरात 2 सशस्त्र गटांमध्ये राडा
ॐ श्री षड्भुजाय नमः
ॐ श्री अक्षमालिने नमः
ॐ श्री कमंडलुधारिणे नमः
ॐ श्री शूलिने नमः
ॐ श्री डमरुधारिणे नमः
ॐ श्री शंखनि नमः
ॐ या उमरपारण नमः
ॐ श्री शंखनि नमः
ॐ श्री गदिने नमः
ॐ श्री मुनये नमः
ॐ श्री मौलिने नमः
ॐ श्री स्वरूपाय नमः
ॐ श्री सहस्रशिरसे नमः
ॐ श्री विरूपाय नमः
ॐ श्री स्वरूपाय नमः
ॐ श्री सहस्रशिरसे नमः
ॐ श्री सहस्राक्षाय नमः
ॐ श्री सहस्रबाहवे नमः
ॐ श्री सहस्रायुधाय नमः
अधिक वाचा : दुधी खा, निरोगी राहा; जाणून घ्या दुधी खाण्याचे फायदे
ॐ श्री सहस्रायुधाय नमः
ॐ श्री सहस्रपादाय नमः
ॐ श्री पद्महस्ताय नमः
ॐ श्री पद्मपादाय नमः
ॐ श्री पद्मनाभाय नमः
ॐ श्री पद्ममालिने नम
ॐ श्री पद्मगर्भारुणाक्षाय नमः
ॐ श्री पद्मकिंजल्कवर्चसे नमः
ॐ श्री ज्ञानिने नमः
ॐ श्री ज्ञानगम्याय नमः
ॐ श्री ज्ञानविज्ञानमूर्तये नमः
ॐ श्री ध्यानिने नमः
ॐ श्री ध्याननिष्ठाय नमः
ॐ श्री ध्यानस्तिमितमूर्तये नमः
ॐ श्री ध्याननिष्ठाय नमः
ॐ श्री ध्यानस्तिमितमूर्तये नमः
ॐ श्री धूलिधूसरितांगाय नमः
ॐ श्री चंदनलिप्तमूर्तये नमः
ॐ श्री भस्मोद्धूलितदेहाय नमः
ॐ श्री दिव्यगंधानुलेपिने नमः
ॐ श्री प्रसन्नाय नमः
ॐ श्री प्रमताय नमः
ॐ श्री प्रकृष्टार्थप्रदाय नमः
ॐ श्री अष्टैश्वर्यप्रदानाय नमः
ॐ श्री वरदाय नमः
ॐ श्री वरीयसे नमः
ॐ श्री ब्रह्मणे नमः
ॐ श्री ब्रह्मरूपाय नमः
ॐ श्री विष्णवे नमः
ॐ श्री विश्वरूपिणे नमः
ॐ श्री शंकराय नमः
ॐ श्री आत्मने नमः
ॐ श्री अंतरात्मने नमः
ॐ श्री परमात्मने नमः