Datta Jayanti Date Pooja Vidhi and Pooja Time: हिंदू धर्मात अनेक देव-देवतांची खास मान्यता आहे. भगवान दत्त देखील त्यापैकी एक आहेत. त्यांना भगवान श्री विष्णूचा अवतार मानलं जातं. श्री दत्त यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीवर झाला होता. यंदाच्या वर्षी तिथीनुसार, 7 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती आहे. (Dattatreya Jayanti 2022 auspicious yog will made on Datta Jayanti read pooja time puja vidhi in marathi)
धर्मग्रंथानुसार, मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला श्री दत्त जयंती साजरी केली जाते. याला दत्त पौर्णिमा असेही म्हटले जाते. भगवान दत्त हे श्री विष्णू यांचे अवतार मानले जातात. काही ग्रंथांमध्ये श्री दत्त यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे संयुक्त अवतार असेही म्हटलं गेलं आहे. दत्त जयंतीला श्री दत्त यांची विशेष पद्धतीने पूजा केली जाते. जाणून घ्या कशा प्रकारे करावी पूजा...
हे पण वाचा : Vastu Tips: संध्याकाळी चुकूनही करू नका ही कामे
पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या तिथी 7 डिसेंबर 2022, बुधवारी सकाळी 8.01 वाजल्यापासून ते 8 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9.38 वाजेपर्यंत आहे. श्री दत्त यांची पूजा प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळच्या सुमारास केली जाते. त्यामुळे 7 डिसेंबर रोजी दत्त जयंती होईल. 7 डिसेंबर रोजी सर्वार्थसिद्धी आणि साध्य नावाचे दोन शुभ योग दिवसभर आहेत. त्यामुळे यंदाच्या दत्त जयंतीचे महत्त्व आणखी वाढले आहे.
हे पण वाचा : नववर्षात शनीदेव बनवणार शश राजयोग, या राशीच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार
श्री दत्त यांची पूजा 7 डिसेंबर रोजी सकाळी लवकर उठून स्नान केल्यावर करावी. व्रत करुन पूजा करावी. यानंतर घरातील एक जागा साफ करुन श्री दत्त यांचा फोटो किंवा मूर्ती लाल कपड्यावर स्थापित करावी.
सर्वप्रथम फोटो किंवा मूर्तीला पुष्पहार घाला. मग देवाला कुंकू लावा. त्यानंतर तांदूळ अर्पण करा. मग एका भांड्यात पाणी घ्या आणि उजव्या हातात फूल, तांदूळ घ्या. त्यानंतर हे खाली सांगितल्याप्रमाणे अर्पण करा.
हे पण वाचा : दही खाण्याची योग्य वेळ कोणती?
ऊँ अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषि: अनुष्टुप छन्द:, श्री दत्त परमात्मा देवत:, श्री दत्त प्रीत्यर्थे जपे विनोयोग:!
हा मंत्र बोलून तुमच्या हातातील फूल आणि तांदूळ हे श्री दत्त यांना अर्पण करा. यानंतर शुद्ध तूपाचा वापर करुन दिवा लावा, अगरबत्ती लावा. मग, गुलाल, अबीर, चंदन हे एक-एक करुन श्री दत्त यांना अर्पण करा.
हे झाल्यावर आपल्या इच्छेनुसार, श्री दत्त यांना नैवेद्य द्या. आपली मनोकामना, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेसह ऊँ द्रां दत्तात्रेयाय नम: या मंत्राचा जप करा. 108 वेळा या मंत्राचा जप करा.