Dhanteras 2021: वर्षभर घरात पैसा राहिला पाहिजे तर धनत्रयोदशीला करा हे उपाय, मनातील इच्छा ही होतील पूर्ण

आध्यात्म
भरत जाधव
Updated Nov 01, 2021 | 11:10 IST

Dhanteras 2021:दिवाळीच्या (Diwali) दिवशी लक्ष्‍मी मातेची (Goddess Lakshmi) पूजा (Worship) करण्याआधी भगवान धन्वंतरी (Dhanvantari) आणि कुबेर (Kuber) देवाची पूजा केली जाते.

Dhanteras 2021
वर्षभर घरात पैसा राहिला पाहिजे तर धनत्रयोदशीला करा हे उपाय  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर पिठाचा चारमुखी दिवा लावावा.
  • या दिवशी नवीन पर्स किंवा बॅग खरेदी करा.
  • धनत्रोयदशीच्या दिवशी कुबेर आणि भगवान धन्वंतरीची पूजा करावी.

Dhanteras 2021:  नवी दिल्‍ली: दिवाळीच्या (Diwali) दिवशी लक्ष्‍मी मातेची (Goddess Lakshmi) पूजा (Worship) करण्याआधी भगवान धन्वंतरी (Dhanvantari) आणि कुबेर (Kuber) देवाची पूजा केली जाते. जेणेकरुन भाविकांना चांगले आरोग्य आणि धन प्राप्ती व्हावी. असे म्हटलं जातं की, समुद्र मंथनामध्ये धनत्रोयदशीच्या दिवशी आरोग्य देवता भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. यामुळे त्यांची पूजा केली जाते. यावर्षी 2 नोव्हेंबर 2021 मंगळवारी धनत्रोयदशी आहे.  

या दिवशी खरेदी केल्याने वर्षभर घरात आनंद राहील. याशिवाय या दिवशी तोटके केल्यानेही खूप फायदा होईल. चंदीगडचे ज्योतिष मदन गुप्ता सप्तू यांनी सांगितले की, व्यक्तीने  धनत्रयोदशीच्या दिवशी कोणती कामे केली पाहिजेत. 

धनत्रयोदशीच्या दिवशी हे काम करा

धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराच्या मुख्य दरवाजासमोर साफसफाई करून रांगोळी काढावी. अगोदर संपूर्ण घराची साफसफाई करून कचरा, अनावश्यक गोष्टी फेकून दिल्या आहेत याची खात्री करा. घरात तुटलेली भांडी असतील तर तीही फेकून द्यावीत. तसेच धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर अशी वस्तू खरेदी करा जी दीर्घकाळ वापरायची आहे. जसे घर, कार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने-चांदी. याचबरोबर धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर पिठाचा चारमुखी दिवा लावावा. ते तांदूळ किंवा गव्हाच्या ढिगाऱ्यावर(रासीवर) ठेवणे चांगले.  या दिवशी गरजूंना औषध दान करा. असे केल्याने आरोग्य चांगले राहते.

हा एक उपाय वर्षभर सुख-समृद्धी देईल

जुनी फाटलेली पर्स बदलण्याचा उत्तम दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी नवीन पर्स किंवा बॅग खरेदी करा. यामध्ये तुमची इच्छा एका चिठ्ठीत लिहा, श्री यंत्र, गोमती चक्र, गोवऱ्या, हळदीचा ढेकूळ, पिरॅमिड, लाल रंगाचे कापड, लाल रेशमी धाग्यात गाठ घालून ते पर्समध्ये ठेवा. असे केल्याने मनोकामना काही दिवसात पूर्ण होईल.मेष, सिंह, वृश्चिक आणि धनु राशीच्या लोकांनी लाल, पिवळा, केशरी किंवा तपकिरी रंगाची पर्स किंवा बॅग घेतल्यास चांगले होईल. दुसरीकडे, वृषभ, तूळ, कर्क राशीच्या लोकांसाठी पांढरी, चांदी, सोनेरी किंवा आकाशी रंगाची पिशवी/पर्स चांगली असेल. याशिवाय मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी निळा, काळा किंवा राखाडी रंग तर मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांसाठी हिरवी पर्स/बॅग खरेदी करणे शुभ राहील.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी