Dhanteras 2021 Shopping: धनत्रयोदशीला खरेदी करायची आहे? जाणून घ्या कोणत्या राशींच्या लोकांनी काय घेतल्यास होईल आर्थिक लाभ

आध्यात्म
भरत जाधव
Updated Nov 02, 2021 | 10:09 IST

Dhanteras 2021 Shopping: धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवशी खरेदी करणे हे खूप शुभ मानले जाते. परंतु ही खरेदी (Shopping) योग्य मुहूर्तात आणि आपल्या राशींनुसार (zodiac ) केली गेली तर यातून अधिक धन लाभ होत असतो.

 Find out what the financial benefits will be if people of which zodiac sign take it
Dhanteras 2021 Shopping: धनत्रयोदशीला खरेदी करायची आहे?   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • धनत्रयोदशीला कोणत्या राशीच्या लोकांनी काय खरेदी करावी.
  • कर्क राशीच्या लोकांसाठी चांदीची भांडी, मोत्याचा हार किंवा अंगठी, घर आणि वाहन खरेदी करणे खूप शुभ
  • धनत्रयोदशीला लाल फळांचे दान करणे मेष राशीसाठी लाभदायक

Dhanteras 2021 Shopping: धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवशी खरेदी करणे हे खूप शुभ मानले जाते. परंतु ही खरेदी (Shopping) योग्य मुहूर्तात आणि आपल्या राशींनुसार (zodiac ) केली गेली तर यातून अधिक धन लाभ होत असतो. पण अतिशय शुभ त्रिपुष्कर योग आणि अमृत लाभ योग तयार होत आहे. याशिवाय सूर्य, बुध आणि मंगळ हे 3 ग्रहही तुला राशीत संयोग करत आहेत. अशा परिस्थितीत आज तुमच्या राशीनुसार खरेदी करणे खूप शुभ ठरेल. चंदीगडचे ज्योतिषी मदन गुप्ता सप्तु यांच्याकडून आपण जाणून घेऊया, धनत्रयोदशीला कोणत्या राशीच्या लोकांनी काय खरेदी करावी.

धनत्रयोदशीच्या राशीनुसार खरेदी करा

मेष:

मेष राशीचे लोक सोन्याचे नाणे, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल, टीव्ही इत्यादी खरेदी करू शकतात. धनत्रयोदशीला लाल फळांचे दान करणे देखील या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ होईल.

वृषभ:

वृषभ राशीचे लोक आज धनत्रयोदशीला सोन्याचे नाणे, संपूर्ण हळद, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर घेऊ शकतात.

मिथुनः

मिथुन राशीच्या लोकांनी फूड प्रोसेसर, मिक्सर, केशर, चमकदार भांडी खरेदी करावी.

कर्कः

कर्क राशीच्या लोकांसाठी चांदीची भांडी, मोत्याचा हार किंवा अंगठी, घर आणि वाहन खरेदी करणे खूप शुभ असते. याशिवाय तुम्ही फ्रीज, वॉटर प्युरिफायर किंवा वॉटर कुलर खरेदी करू शकता.

सिंहः

सिंह राशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने किंवा सोन्याची नाणी खरेदी केली तर त्यांना वर्षभर सुख-समृद्धी मिळते. या लोकांनी आज मध किंवा खजूर एखाद्याला नैवेद्य किंवा दान म्हणून द्यावे.

कन्याः

कन्या राशीचे लोक नवीन मोबाईल, ब्रॉडबँड कनेक्शन, टीव्ही आणि दळणवळण संबंधित उपकरणे, स्टीलची भांडी, घरगुती उपकरणे खरेदी करू शकतात. लक्षात ठेवा की, आज क्रेडिट कार्डद्वारे किंवा कर्ज घेऊन खरेदी करू नका.

तुलाः

तूळ राशीचे लोक चांदीची भांडी, अत्तर घेऊ शकतात. रिअल इस्टेटमधील गुंतवणूकही त्यांच्यासाठी खूप शुभ ठरेल.
वृश्चिकः तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू, तांब्याची भांडी, सजावटीच्या वस्तू खरेदी करू शकता. तुम्ही खरेदी करत असलेला वस्तू जर लाल रंगाचा असेल तर चांगला होईल.

धनुः

आज धनु राशीच्या लोकांनी लक्ष्मीजींचा फोटो असलेले सोन्याचे नाणे किंवा देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करून तिची पूजा करावी. त्यानंतर वर्षभर त्याची पूजा करा, खूप फायदा होईल.

मकरः

मकर राशीचे लोक घर किंवा जमिनीची खरेदी करू शकतात. याशिवाय तुम्ही वाहने, भांडी, इलेक्ट्रिकल वस्तू खरेदी करू शकता. 

कुंभः

कुंभ राशीचे लोक लोखंडी तवा, कुकर, फ्रीज, टीव्ही, कार घेऊ शकतात. जर या गोष्टी काळ्या, निळ्या किंवा राखाडी रंगाच्या असतील तर ते खूप चांगले आहे.

मीनः

मीन राशीच्या लोकांनी घर किंवा फ्लॅट घेतला असेल तर आज त्याचा ताबा घेणे खूप शुभ ठरेल. याशिवाय प्रॉपर्टीमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. आपण तांब्याची भांडी देखील खरेदी करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी