Dhantrayodashi 2021 Wishes in marathi: दिवाळीत धनत्रयोदशीला खास मराठी  Wishes, WhatsApp and Facebook Status च्या माध्यमातून द्या शुभेच्छा

Dhantrayodashi 2021 Wishes in marathi: हिंदू धर्मातील वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी (Diwali 2021)ला सुरूवात झाली  आहे. तब्बल 5 दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारस पासून होते.

dhantrayodashi 2021 Dhanteras messages in diwali celebrate dhanteras and dhantrayodashi
दिवाळीत धनत्रयोदशीला खास मराठी मेसेज 
थोडं पण कामाचं
  • यंदा वसुबारस 1 नोव्हेंबर दिवशी आहे. त्यानंतर धनत्रयोदशीचा (Dhantrayodashi 2021) दिवस साजरा होतो.
  • यंदा 2 नोव्हेंबर धनत्रयोदशी दिवशी आहे. या दिवशी आयुर्वेदाची देवता धन्वंतरीची पूजा केली जाते.
  • धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या 13 व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला असा समज आहे.

Dhantrayodashi 2021 Wishes in marathi: हिंदू धर्मातील वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी (Diwali 2021)ला सुरूवात झाली  आहे. तब्बल 5 दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारस पासून होते. यंदा वसुबारस 1 नोव्हेंबर दिवशी आहे. त्यानंतर धनत्रयोदशीचा (Dhantrayodashi 2021) दिवस साजरा होतो. यंदा 2 नोव्हेंबर धनत्रयोदशी दिवशी आहे. या दिवशी आयुर्वेदाची देवता धन्वंतरीची पूजा केली जाते. धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या 13 व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला असा समज आहे. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे.

असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला, म्हणून या दिवशी धन्वंतरीची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. तर यंदाच्या धनत्रयोदशीला खास मराठी Messages, Wishes, WhatsApp Status, HD Images च्या माध्यमातून शुभेच्छा द्या.

द्या धनत्रयोदशीच्या विशेष शुभेच्छा!

dhanteras marathi message

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असो

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो

ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास आनंदाची व भरभराटीची जाओ

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

dhateras marathi message 4

dhateras marathi message 1

तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असो

तुमच्या जीवनात दुःखाची काळी छाया नसो

यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास ठरो

आप्तेष्ठांची सदैव साथ राहो

धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा!

dhateras marathi message 5

dhateras marathi message 3

दिवाळीचा हा सण,

तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर करून

तुमच्यावर सुखाची बरसात करो... हिच इच्छा

धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा!

dhateras marathi message 6

dhateras marathi message 7

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी