Vastu for Office: नोकरीत प्रगती आणि प्रमोशन हवं असेल तर ऑफिसमध्ये करा ‘हा’ उपाय

आध्यात्म
Updated Dec 02, 2019 | 14:07 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

यश मिळणं हे नेहमी आपल्या मेहनतीवर अवलंबून असतं. मात्र आपल्या ऑफिसमधील जागा वास्तूच्या हिशोबानं बरोबर नसेल तर कितीही मेहनत केली तरी यश मिळण्यात संकटांचा सामना करावा लागतो. जाणून घ्या याबाबत...

Vastu for Office
नोकरीत प्रगती आणि प्रमोशन हवं असेल तर ऑफिसमध्ये ‘हा’करा उपाय 

थोडं पण कामाचं

  • अर्धवर्तूळाकार टेबलवर कधीही मिटींग करू नये
  • ऑफिसमध्ये नेहमी उत्तर-पूर्व दिशेला बसावं
  • ऑफिस फर्नीचर नेहमी लवचिक असावं, बॉसचा दरवाजा आतल्या बाजूला उघडावा.

Vastu Tips: आपण खूप मेहनत करतो पण कितीही मेहनत केली तरी आपल्याला ऑफिसमध्ये हवं असलेलं यश कधी-कधी मिळत नाही. आपण इतकी मेहनत करूनही असं का होतं, याचा विचार करतो पण तेव्हा आपण एका गोष्टीकडे लक्ष देत नाही. ते म्हणजे ऑफिसच्या वास्तूकडे... आपल्या ऑफिसची वास्तू आणि बसण्याची दिशा काय आहे? तसंच आपल्या केबिनचा दरवाजा कोणत्या दिशेला उघडतो या सर्व बाबींकडे लक्ष देणं आवश्यक आहे.

वास्तूबाबत काही संकेत दिलेले आहेत जे आपल्या यशावर प्रभाव टाकतात. एवढंच नव्हे तर आपण जर बॉस असाल आणि आपल्या म्हणण्यानुसार कर्मचारी काम करत नसतील तर आपण बसत असलेल्या ठिकाणाची आणि मीटिंगची दिशा अवश्य बघावी. कामाच्या ठिकाणी पॉझिटिव्ह वाईब्स असण्यासाठी वास्तू योग्य दिशेला असणं गरजेचं आहे.

वास्तूच्या या काही नियमांकडे लक्ष द्यावे

असा असावा ऑफिसच्या भिंतींचा रंग

ऑफिसच्या भिंतींचा रंग हलका असावा. भिंतीच्या रंगाचा प्रभाव हा तिथं काम करणाऱ्या लोकांच्या मेंदूवर होत असतो. लाईट कलर कामात गती आणतो. तर गडद रंग काम करण्याची इच्छा कमी करतो. हलक्या रंगामुळे मन:शांती कायम राहते.

फर्नीचरवर लक्ष द्यावं

ऑफिसचं फर्नीचर नेहमी फ्लेक्सिबल असावं. यामुळे तिथं काम करणाऱ्यांनाही लवचिकपणा जाणवतो. आराम मिळत असेल अशी स्थिती कर्मचाऱ्यांचं काम अधिक उत्तम बनवते.

 

 

ऑफिसमध्ये बसण्याची दिशा

ऑफिसमध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसावं. आपण ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी असा किंवा बॉस प्रत्येकाची बसण्याची दिशा ही उत्तर-पूर्व असावी.

कधीही मिटींग अशा टेबलवर करू नये

ऑफिसमध्ये जर आपण मिटींग करत असाल. तर लक्षात ठेवा मिटींग टेबल अर्ध-वर्तूळाकार कधीही असू नये. अशा टेबलवर मिटींग केल्यानं आपले संकटं वाढतील आणि त्यामुळे नुकसान होऊ शकतं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Playing with curves#dnm#jeb#curvedglass#indianoffice#office design#bentglasspartition

A post shared by Sumeet Mahajan (@sumeet2212) on

 

केबिनचा दरवाजा या दिशेला उघडायला हवा

ऑफिसमध्ये बॉसच्या केबिनचा दरवाजा नेहमी आतल्या बाजूला उघडला पाहिजे. यानं सकारात्मकता येते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A modern, bright office with a lots of glass, that supports a ideal work environment.

A post shared by blocherpartners_india (@blocherpartners_india) on

 

मंदिराची दिशा पाहा

ऑफिसमध्ये मंदिर अशा जागेवर असायला हवं, जिथं येता-जाता सर्वांची नजर खिळली पाहिजे आणि लोकांनी दर्शन घेतलं पाहिजे.

वास्तूच्या या बाबींकडे जर लक्ष दिलं तर यश आपल्यासाठी नेहमी प्रगतीचे नवीन द्वार उघडतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी