Diwali 2021: धनत्रयोदशीला या गोष्टींचे दान केल्यानं खुलतं भाग्य, पडेल पैशांचा पाऊस

आध्यात्म
भरत जाधव
Updated Oct 26, 2021 | 12:01 IST

धनत्रयोदशीला (Dhanteras) कपडे, भांडे, सोने-चांदी, खरेदी करण्याची परंपरा (Tradition) चालू आहे. परिस्थिती बदल्याने आता या वस्तूंमध्ये गाड्या (Vehicles) आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या (Electronics) वस्तूंचा समावेश झाला.

Diwali 2021 Donating these things to Dhanteras opens fortunes
Diwali 2021: धनत्रयोदशीला या गोष्टींचे दान केल्यानं खुलतं भाग्य  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • गरजुंना वस्तूंचे दान केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होत असते आणि पूर्ण वर्षभर आपल्या घरात समुद्धी येत असते.
  • सूर्यास्त होण्याच्या आधीच दान केले गेले पाहिजे.
  • धनत्रयोदशीला आपण नव्या कपड्यांची खरेदी करत असतो, परंतु या दिवशी आपण गरीबांना कपडे दानही करावे.

नवी दिल्‍ली: धनत्रयोदशीला (Dhanteras) कपडे, भांडे, सोने-चांदी, खरेदी करण्याची परंपरा (Tradition) चालू आहे. परिस्थिती बदल्याने आता या वस्तूंमध्ये गाड्या (Vehicles) आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या (Electronics) वस्तूंचा समावेश झाला. परंतु धनत्रयोदशीला वस्तू खरेदी करण्याबरोबर वस्तूदान करण्याची परंपरा पण आहे. या दिवशी गरजुंना वस्तूंचे दान केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होत असते आणि पूर्ण वर्षभर आपल्या घरात समुद्धी येत असते. यावेळी 2 नोव्हेंबर रोजी मंगळवारी धनत्रयोदशी आहे. यामुळे या दिवशीही आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर या दिवशी काही वस्तूंचे दान करावे. 

धनत्रयोदशीला नक्की करा दान 

धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्याबरोबर दानही करावं. परंतु दान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, सूर्यास्त होण्याच्या आधीच दान केले गेले पाहिजे. तर या दिवशी कोणालाही पांढऱ्या रंगाची वस्तू जसे की, दूध, दही मिठाई देऊ नये. असे करणे अशुभ मानले जाते. काही अशा वस्तू आहेत ज्यांचे धनत्रयोदशीला दान केले गेले पाहिजे. या वस्तूंचे दान करणं खूप शुभ मानलं जाते. 

धान्य :

धनत्रयोदशीच्या दिवशी धान्य दान केल्याने आपल्या घरातील धान्य भंडारमध्ये वाढ होत असते. जर आपल्याकडून धान्याचे दान केले जात नसेल तर गरीब लोकांना जेवण द्यावे. 

लोखंड -

धनत्रयोदशीला लोखंड दान केल्याने आपलं नशीब बदलत असते. आपली अडकलेली कामे पूर्ण होत असतात.

कपडे -

धनत्रयोदशीला आपण नव्या कपड्यांची खरेदी करत असतो, परंतु या दिवशी आपण गरीबांना कपडे दानही करावे. कपड्याचे दान केल्याने आपली परिस्थिती बदलत असते. कुबेर देवाची कृपा आपल्यावर होत असून आपल्याला पैसे-संपत्तीचा लाभ होत असतो. या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे कपडे दान करावेत. 

झाडू- 

धनत्रयोदशीला नवीन झाडू खरेदी करण्याची परंपरा आहे. पंरतु या दिवशी झाडू दान केल्यास शुभ असते. मंदिरातील एखाद्या सफाई कर्मचारीला झाडू दान केल्यास आपल्याला आर्थिक लाभ होत असतो.

(नोट: या लेखातील माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी या पृ्ष्टी करत नाही. )

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी