Vastu Shastra । मुंबई : वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. जर तुम्ही तुमचे काम वास्तुनुसार करायला सुरुवात केली तर तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक बदल पाहायला मिळतील. तसेच जर तुम्ही वास्तूला हलके घेतले तर ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते. वास्तुशास्त्रानुसार एखाद्या घरात वास्तुशी संबंधित दोष आढळल्यास अनेक समस्या उद्भवतात. (Do not accidentally place a lamp in this direction at the place of worship).
अधिक वाचा : ऊसाचा रस पिण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, नाहीतर ...
घरामध्ये मंदिराचे खूप महत्व मानले जाते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मंदिरातील दिव्याची ज्योत. कारण वास्तुशास्त्रामध्ये पूजा घराबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. पूजा करताना सर्वकाही योग्य ठिकाणी नसेल तर ते तुमच्यासाठी ते अत्यंत त्रासदायक ठरू शकते. देव-देवतांची पूजा करताना पूजेच्या वस्तू जसे की कलश, अगरबत्ती, दिवा किंवा इतर साहित्य योग्य दिशेने न ठेवल्यास व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा अभाव निर्माण होतो आणि पूजेचे पूर्ण फळही मिळत नाही. त्याचप्रमाणे मंदिरातील दिव्याची ज्योत कोणत्या बाजूला आहे याची विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही असे केले नाही तर तुमच्या घरातून सुख आणि शांती दूर जाण्याची शक्यता आहे.
डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.