Ganesh Chaturthi 2022 Murti Direction: गणपती बाप्पाची 'अशी' मूर्ती आणू नका घरी!

Ganesh Chaturthi 2022 Murti Sthapna: गणेश चतुर्थीचा सण 31 ऑगस्टपासून देशभरात साजरा केला जाणार आहे. या दिवशी घरामध्ये गणपतीची मूर्ती स्थापन करुन विधिवत पूजा केली जाते. तुम्हीही गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरी आणणार असाल तर सर्वप्रथम काही महत्त्वाचे नियम जाणून घ्या.

do not bring such an idol of ganpati bappa home on ganesh chaturthi keep it in northeast
गणपती बाप्पाची 'अशी' मूर्ती आणू नका घरी! 
थोडं पण कामाचं
  • 31 ऑगस्टपासून होणार गणेशोत्सवाला सुरुवात
  • गणेश चतुर्थीला अशी नेमकी कोणी मूर्ती आणावी घरी?
  • घराच्या दक्षिण दिशेला गणपती ठेऊ नये

Ganesh Chaturthi 2022 Murti Sthapna: गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) सणाला 31 ऑगस्टपासून सुरुवात  होणार आहे. त्यानंतर पुढील 10 दिवस राज्यभरात जल्लोषात गणेशोत्सव (Ganeshostav) साजरा केला जाईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये गणपती बाप्पाच्या (Ganpati Bappa) मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करुन विधिवत पूजा केली जाईल. यानंतर गणपती बाप्पा दहा दिवस आपल्या भक्तांच्या घरी विराजमान असतो. अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता होते. ज्यावेळी गणेशभक्त 'गणपती बाप्पा मोरया' असा जयघोष करत बाप्पाला जड अंतकरणाने निरोप देतात. (do not bring such an idol of ganpati bappa home on ganesh chaturthi keep it in northeast)

दरम्यान, या सगळ्यामध्ये बाप्पाची पूजा आणि इतर गोष्टी विधीवतपणे होणं गरजेचं आहे. ज्योतिषी सांगतात की, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मूर्ती बसवताना त्यात काही खास गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. यामध्ये मूर्तीची निवड करून ती घराच्या योग्य दिशेने ठेवणं यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. असं म्हटलं जातं की, गणपती बाप्पाची चुकीची मूर्ती घरात आणल्याने भक्तांना त्याच्या पूजेचे फळ मिळत नाही.

अधिक वाचा: Happy Ganesh Chaturthi in Marathi Wishes : गणेश चतुर्थीनिमित्त Facebook, Instagram WhatsApp, Twitter आणि Social media वर मराठीतून द्या शुभेच्छा

गणपती बाप्पाची कशी मूर्ती घरी आणावी?

हिंदू धर्मातील जाणकार सांगतात की, घरात गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यापूर्वी तिची सोंड जरुर पाहून घ्या. ज्या गणेशाची सोंड उजवीकडे वळलेली आहे ती सिद्धीपीठाशी निगडीत आहे. याला दक्षिणामूर्ती किंवा दक्षिणाभिमुख मूर्ती असेही म्हणतात. दक्षिण दिशा ही यमलोकाची दिशा मानली जाते. त्यामुळे अशा गणेशाची मूर्ती घरात ठेवू नये. फक्त डाव्या बाजूला सोंड असलेली गणपती बाप्पाची मूर्ती ही घरी  आणावी. अशा मूर्तीची पूजा करणे शुभ मानलं जातं.

अधिक वाचा: Lalbaugcha Raja 2022 LIVE: राजा भक्तांच्या भेटीला, पाहा लालबागच्या राजाची पहिली झलक

गणपती बाप्पाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी?

या गणेश चतुर्थीला तुम्हीही घरात गणपती बाप्पा बसवणार असाल तर काही खास गोष्टी लक्षात ठेवा. दिशा आणि कोनाच्या आधारे गणेशमूर्तीची स्थापना केल्यास तुमची पूजा नक्कीच फलदायी ठरु शकते. गणपतीची योग्य दिशेने स्थापना केल्यास आर्थिक समृद्धीची दारे देखील खुली होतात.

ज्योतिषी सांगतात की, घराच्या ईशान्य कोपर्‍यात गणपतीची मूर्ती ठेवणे उत्तम. घराच्या पूर्व-उत्तर कोपऱ्याला ईशान्य कोपरा म्हणतात. या दिशेला तुम्ही निसंकोचपणे गणेश मूर्तीची स्थापना करू शकता. तर घराच्या दक्षिण दिशेला गणेश मूर्तीची स्थापना करू नये.

(टीप: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी