मुंबई: अवघ्या काही दिवसांवर श्रावण(shravan) महिना येऊन ठेपलाय. या महिन्यात भगवान शंकराची (lord shiva)आराधना केली जाते. तसेच हा महिना देवांचे देव महादेव यांना खूप प्रिय आहे आणि जे भक्त मनापासून या महिन्यात शंकराची पुजा करतात त्यांना वरदान मिळते. शिवपुराणाबद्दल बोलायचे झाल्यास त्यात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या शंकराच्या पुजेत कधीच सामील करू नयेत. असे केल्याने भगवान शंकर नाराज होतात ज्यामुळे त्या व्यक्तीला नुकसान सोसावे लागू शकते. जाणून घ्या अशी कोणती कामे आहेत जी व्यक्तीने कधीच करू नयेत. Do not give this things to lord shiva
अधिक वाचा - मुसळधार पाऊस, पुरामुळे अनेक ट्रेन रद्द, पाहा यादी
पुराणात भगवान शंकरांना विनाशक म्हटले आहे. म्हणजेच जेव्हा जगात अत्याचार वाढतात तेव्हा ते आपला तिसरा डोळा उघडून हे जग नष्ट करता. त्यांनी माता पार्वतीशी लग्न करत केले होते मात्र ते मूळत: वैरागी आहेत. यामुळेच त्यांच्या पुजेच्या थाळीत कुंकू अथवा सिंदूरसारख्या गोष्टी ठेवल्या जात नाहीत. यामुळे चुकूनही याचा समावेश थाळीत करू नका.
धर्मशास्त्रानुसार भगवान शंकरांनी आपल्या त्रिशूळाने शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्याच्या राखेतून शंखाची उत्पत्ती झाली होती. यामुळे महादेवाच्या पुजेदरम्यान शंख वाजवणे वर्ज्य मानले जाते. तसेच शंखाने शंकरावर जलाभिषेकही करू नये. याचे कारण म्हणजे भगवान शंकर महान तपस्वी आहेत जे नेहमी आपल्या तपस्येत लीन असतात. अशातच गोंधळ घालून त्यांची तपस्या भंग होण्याची भीती असते.
हळदीला खरेतर सौभाग्य आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. देवी-देवता पुजेदरम्यान थाळीमध्ये हळद ठेवतात. मात्र शंकराच्या पुजेच्या थाळीत तुम्ही चुकूनही हळद ठेवू नका. याचे कारण भगवान शंकर हे वैरागी आहेत आणि त्यांना या सजावटीच्या गोष्टी आवडत नाहीत.
अधिक वाचा - अखेरच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाकडून जपान पराभूत
भगवान शंकरांशी संबंधित एका कथेत त्यांनी तुलसीचे पती जालंधरचा वध केला होता. त्यानंतर तुलसी माता भगवान शंकरावर नाराज झाली होती आणि तिने श्राप दिला होता की जर एखादा भक्त शंकराच्या पुजेच्या थाळीत तुळशीचा समावेश करेल तर त्याला चांगले परिणाम भोगावे लागणार नाहीत. त्यामुळे भगवान शंकराच्या पुजेदरम्यान तुळशीची पाने चढवली जात नाहीत.