Ratna Jyotish: रत्न परिधान करताना या चुका करु नका अन्यथा होईल उलट परिणाम

Gemstone: ग्रह आणि राशीनुसार अनेकांना रत्ने घालण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, कोणतेही रत्न परिधान करताना एक विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तरच त्याचा फायदा होऊ शकतो. 

do not make these mistakes while wearing gemstones otherwise you will face opposite effect rules for gemology in marathi
Ratna Jyotish: रत्न परिधान करताना या चुका करु नका अन्यथा होईल उलट परिणाम (Photo: iStock) 
थोडं पण कामाचं
  • तुम्हीही रत्न परिधान करता?
  • रत्न परिधान करताना घ्या विशेष काळजी
  • या चुका केल्या तर रत्नांचा होईल उलट परिणाम 

Gemstone rules: ज्योतिषशास्त्रात रत्नांना फार महत्त्व आहे. कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहूनच ज्योतिष रत्न ठरवण्यात येते. रत्नांबाबत सांगायचे झाले तर, नऊ ग्रहांनुसार सूर्यासाठी माणिक, चंद्रासाठी मोती, मंगळासाठी पोवळे, बुधसाठी पन्ना, गुरूसाठी पुष्कराज, शुक्रासाठी हिरा, शनीसाठी नीलम, राहूसाठी गोमेद आणि केतूसाठी लसण्या आहे. याशिवाय या रत्नांचे उपरत्न सुद्धा आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, रत्न धारण करण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीने ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यासोबतच काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही रत्ने शुभ तर आहेतच त्यासोबतच अशुभही ठरू शकतात. त्यामुळे रत्न परिधान करताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. (do not make these mistakes while wearing gemstones otherwise you will face opposite effect rules for gemology in marathi)

रत्न धारण करताना या चुका करू नका

दुधात जास्त वेळ रत्ने टाकू नका

ज्योतिषशास्त्रानुसार, अशी अनेक रत्ने आहेत जी दूध शोषून घेतात. त्यामुळे रत्न धारण करण्याच्या काही वेळापूर्वी दुधात रत्न टाका. बरेच लोक रात्रभर दुधात रत्न टाकून ठेवतात. अशा स्थितीत रत्नाच्या आत दूध शोषले जाते आणि परिणामी रत्न खराब होते.

अधिक वाचा : Vastu Tips: गरोदर महिलांनी चुकूनही आपल्या खोलीत वस्तू ठेवू नयेत

या दिवशी रत्ने घालू नका

रत्न धारण करण्यासाठी एक तारीख देखील आहे. त्याचप्रमाणे महिन्याच्या ४, ९ आणि १४ तारखेला रत्न कधीही परिधान करु नका. यासोबतच अमावस्या, ग्रहण आणि संक्रांतीच्या दिवशी रत्ने धारण करु नका.

अधिक वाचा : ज्योतिष: हळदीसह या तीन गोष्टी कोणालाही देऊ नका उधार, नाहीतर होणार नाही घराची प्रगती

या दिशेला तोंड करून रत्ने परिधान करा

ज्योतिषशास्त्रानुसार, रत्न धारण करताना व्यक्तीच्या चेहऱ्याची दिशाही योग्य असावी. त्यासोबतच रत्न हे दुपारच्या आधी धारण करावे आणि आपला चेहरा हा पूर्व दिशेला असावा. 

कोणत्या नक्षत्रात रत्न धारण करणे शुभ

रेवती, अश्विनी, हस्त, चित्रा, अनुराधा नक्षत्रावर समुद्राशी संबंधित मोती, प्रवाळ धारण करा.

विवाहित महिलांनी या नक्षत्रात रत्न धारण करू नये

ज्योतिषशास्त्रानुसार, विवाहित महिलांनी रोहिणी, पुनर्वसु, पुष्य नक्षत्रात रत्न धारण करू नये.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी