Garuda Purana Auspicious Things: गरुड पुराण हे विष्णु पुराणचाच एक भाग आहे. गरुड पुराणात विष्णु आणि पक्ष्यांचा राजा गरुड यांच्यातील संवाद आहे. या पुराणाचा दुसरा खंडात मृत्युशी निगडीत, विशेषतः अंत्यसंस्कार आणि पुनर्जन्म याचांशी संबंधीत आहे. घरात एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यास गरुड पुराणाचा पाठ केला जातो. असा समज आहे की, याने आत्म्याला मोक्ष मिळतो आणि तो संसारीक जीवनातून मोकळा होतो.
गरुड पुराणात अशा अनेक गूढ गोष्टींचा समावेश आढळतो. जर तुम्ही या गोष्टी आपल्या आयुष्यात अंमल केल्या तर कोणत्याही दुःखाचा सामना करावा नाही लागणार. माणसाला आनंदी जीवन जगायचे असेल तर त्याने रोज काही खास काम केले पाहिजे. ही कामं करणाऱ्यांना वैभव प्राप्त होते आणि भरभराट होते. चला बघूया कोणती कार्य आहेत.
गरुड पुराणानुसार तुमच्या अन्नाचा काही भाग गरीब किंवा गरजू व्यक्तींना वाटून द्या. जरी तुम्ही श्रीमंत असालं तरी गरीब आणि गरजूंना जेवण देऊन पुण्य कमवू शकता. यासोबतच लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अशीच राहिल आणि कुटुंबाची भरभराट होईल.
अधिक वाचा : border-gavaskar trophy :बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 200 पेक्षा जास्त रन बनवणारे खेळाडू
गरुड पुराणानुसार गाईची सेवा केल्याने पुण्य प्राप्ती होते. जो व्यक्ती रोज गाईची पूजा करतो तो आयुष्यात सूखी होतो.
गरुड पुराण सांगतं की, माणसांनी आपल्या पित्रांची आणि कुलदेवतांची पूजा करावी. जो व्यक्ती आपल्या पित्रांची आणि कुलदेवतांची पूजा करतो, त्यांना कधीच कोणती समस्या येत नाही. अशा लोकांवर त्यांची नेहमीच कृपा असते.
अधिक वाचा : Made In India: भारतातील पहिली कार कोणती माहितीये का?
शास्त्रानुसार घरात बननारी पहिली चपाती ही गाईला तर शेवटची चपाती ही कुत्र्याला खायला द्यायची असते. याशिवाय, पशु-पक्षांना दाणे देण्याची व्यवस्था करणे, माशांना पीठचे गोळे देणे, मुंग्याना साखर देणे अशी अनेक कामे पुण्याची मानली जातात. गरुड पुराणानुसार जी व्यक्ती पशु-पक्षांची सेवा करतो त्यांना आयुष्यात सफलता आणि सुख समृद्धी मिळते.