Vastu Tips: या दिशेला करा पाण्याच्या मडक्याच्या संबंधित हे उपाय; लगेच व्हाल मालामाल

आध्यात्म
Updated Jun 23, 2022 | 10:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vastu Tips For Home | घरातील मातीचे भांडे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करू शकतात. रेफ्रिजरेटर, वॉटर कुलरच्या काळातही बरेच लोक मातीच्या भांड्यातील पाणी वापरतात. काही लोकांना ओल्या मातीचा वासही खूप आवडतो.

Do these remedies in relation to the water pot, know its benefits
पाण्याच्या मडक्याशी संबंधित हे उपाय केल्याने होईल धनलाभ   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • घरातील मातीचे भांडे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करू शकतात.
 • मातीच्या भांड्याशी संबंधित काही वास्तु टिप्स आहेत.
 • घरामध्ये मातीचे भांडे ठेवताना त्याच्या दिशेचे ज्ञान असणे खूप आवश्यक आहे.

Vastu Tips For Home | मुंबई : घरातील मातीचे भांडे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करू शकतात. रेफ्रिजरेटर, वॉटर कुलरच्या काळातही बरेच लोक मातीच्या भांड्यातील पाणी वापरतात. काही लोकांना ओल्या मातीचा वासही खूप आवडतो. लक्षणीय बाब म्हणजे मातीच्या भांड्याशी संबंधित काही वास्तु टिप्स देखील आहेत, ज्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकू शकतात आणि आनंद आणू शकतात. अशा परिस्थितीत हे उपाय जाणून घेणे आवश्यक आहे. आज आपण अशाच काही प्रभावी वास्तु टिप्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या साहाय्याने घरातील धन-संपत्ती वाढण्यास मदत होते. (Do these remedies in relation to the water pot, know its benefits). 

अधिक वाचा : ही आसने रक्तातील साखर कमी करण्यासाठी प्रभावी, वाचा सविस्तर

मातीच्या मडक्याच्या संबंधित वास्तु उपाय

 1. घरामध्ये मातीचे रिकामे भांडे कधीही ठेवू नका. मातीचे भांडे पाण्याने भरणे आवश्यक आहे. मातीचे रिकामे भांडे घरात ठेवल्यास अथवा त्याचा वापर न केल्यास ते अशुभ असल्याचे मानले जाते. 
 2. घरामध्ये मातीचे भांडे ठेवताना त्याच्या दिशेचे ज्ञान असणे खूप आवश्यक आहे. मडके उत्तर दिशेला ठेवणे नेहमीच शुभ मानले जाते. 
 3. जे मानसिक तणावाने त्रस्त आहेत किंवा मानसिक आजारांनी त्रस्त आहेत त्यांनी भांड्यात ठेवलेल्या झाडावर पाणी दिल्यास फायदा होतो.
 4. पैशाच्या कमतरतेमुळे घरामध्ये तणाव असेल किंवा आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असाल तर अशा स्थितीत उत्तर दिशेला पाण्याने भरलेल्या मडक्यासमोर तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने पैशाची कमतरता पूर्ण होते.
 5. घरात पाण्याचे भांडे ठेवल्याने नात्यात सुसंवाद येतो.

चांदीचा हत्ती घरात ठेवल्याचे फायदे 

 1. वास्तुशास्त्रानुसार चांदीच्या हत्तीची मूर्ती घराच्या उत्तर दिशेला ठेवल्यास ऐश्वर्य तर वाढतेच, पण सुख-शांतीही प्राप्त होते. असे म्हणतात की, चांदीच्या हत्तीवरून गणेश आणि देवी लक्ष्मीच्या आशिर्वादांचा वर्षाव होतो.
 2. चांदीचा हत्ती घरात आणल्याने मान-सन्मान वाढतो. तसेच ते इच्छाशक्ती देखील मजबूत करते.
 3. व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती करायची असेल तर घरात चांदीच्या हत्तीची जोडी ठेवा.
 4. मुलाला अभ्यास करायला आवडत नसेल अथवा त्याचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर चांदीच्या हत्तीची मूर्ती अभ्यासाच्या खोलीत ठेवावी.
 5. जर पैशाची कमतरता असेल तर घराच्या मुख्य दरवाजासमोर चांदीच्या हत्तीची मूर्ती ठेवा. स्वतंत्र बेडरूममध्ये हत्तीची मूर्ती जोडीने ठेवल्यास पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येतो.

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी