Shani Amavasya । मुंबई : यंदा शनिचरी आमावस्या ३० एप्रिल रोजी आहे. शनिवारी वैशाख आमावस्या तिथी असल्याने याला शनि आमावस्या (Shani Amavasya) असे म्हणतात. तसेच या आमावस्येला शनिचरी आमावस्या देखील म्हणतात. वर्षातील पहिले सूर्यग्रहण देखील शनिचरी आमावस्येला होत आहे. शनिदेव आणि सूर्यदेव हे दोन्ही विरूद्ध स्वभावाचे असले तरी शनिचरी आमावस्येला तुम्ही काही महत्त्वपूर्ण उपाय करून तुमचे भाग्य बदलू शकता. यासाठी तुम्हाला शनिदेवाचा आशिर्वाद घ्यावा लागेल. ज्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते त्यांचे सर्व दु:ख दूर होऊन जीवनात प्रगती होते. (Do these simple 5 remedies to Shanishchari Amavasya).
अधिक वाचा : दहावीची परीक्षा देण्यासाठी आले ५८ वर्षांचे आमदार
१) स्कंद पुराणानुसार, शनिचरी आमावस्येच्या दिवशी माही नदीत स्नान केल्याने शनीची साडेसाती, धैय्या आणि शनिदोषाच्या वेदनांपासून आराम मिळतो. तसेच सर्व दु:ख दूर होतात.
२) शनिचरी आमावस्येला शनिदेवाची विधिवत पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. पूजेच्या वेळी निळी फुले, काळे तीळ, मोहरीचे तेल इत्यादी श्रद्धेने अर्पण करावे. शनिदेवाच्या कृपेने प्रत्येक कामात यश मिळेल, संकटे आणि पापे दूर होतील.
३) शनिचरी आमावस्येच्या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला मदत करा. त्याला काहीही खायला द्या. त्याला कपडे, शूज, चप्पल इत्यादी द्या. गरीबांना मदत करणाऱ्यांवरही शनिदेव प्रसन्न असतात.
४) शनिचरी आमावस्येला कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीला सिंदूर अर्पण करून हनुमान चालिसाचे पठन करावे. असे केल्याने शनीच्या दुखापासून आराम मिळेल.
५) शनिदेवाचा आशिर्वाद मिळवण्यासाठी शनिचरी आमावस्येला काळी उडीद, लोखंड, काळे किंवा निळे वस्त्र, काळे तीळ, शनि चालिसा, स्टीलची भांडी इत्यादी दान करा. साडेसाती, धैय्या आणि शनिदोषाचे दुष्परिणाम दूर होतील.
वैशाख महिन्याच्या अमावस्या तिथीची सुरुवात - ३० एप्रिल, शनिवार, दुपारी १२.५७ पासून.
वैशाख महिन्याच्या अमावस्येची समाप्ती - ०१ मे, रविवार, सकाळी ०१:५७ वाजता.
प्रीति योग - दुपारी ०३:२० पर्यंत, त्यानंतर आयुष्मान योग सुरू होईल.
दिवसाची भाग्यवान वेळ- सकाळी ११:५२ ते दुपारी १२:४५ पर्यंत.
राहुकाल- सकाळी ०९:०० ते सकाळी १०:३९ पर्यंत.