नवी दिल्ली : शनिची साडेसाती (Shani Sade Sati), अडीच वर्ष किंवा शनिच्या महादशेचा आयुष्यात कमीत कमी एकदा तरी सामना प्रत्येकाला करावा लागतो. न्यायदेवता शनि (shani) प्रत्येकाला त्यांच्या कर्मांच्या आधारावर शुभ-अशुभ प्रभाव देतात. येत्या शनिवारी म्हणजेच 27 ऑगस्ट या आठवड्यात शनी अमावस्येच्या (Shani Amavasya) दिवशी शनिची साडेसाती असलेल्या लोक शनिदेवाला (Shani Dev) प्रसन्न करण्यासाठी उपाय करू शकतात. ही वर्षातील शेवटची शनिश्चरी अमावस्या आहे. याला कुशग्रहिणी अमावस्या म्हणतात.
यावेळी धनू राशीवर शनिच्या साडेसातीचे तिसरे चरण चालू आहे. मकर वर दुसरे मध्य व कुंभ राशीवर पहिले चरण चालू आहे. साडेसातीचा दुसरा चरण अधिक त्रास देणारा असतो असे मानले जाते. तथापि शेवटच्या तिसऱ्या चरणात शनिदेव आशीर्वाद किंवा काही ना काही नक्कीच देऊन जातात. दरम्यान शनिची साडेसाती किंवा अडीच वर्षाची महादशा कमी करायची असेल तर या शनि आमवस्याला उपाय करुन त्याचा प्रभाव कमी करू शकतात.
Read Also : कोणत्या स्त्रियांकडे असतो पैसा, कोण बनतं विनाशाचे कारण?
शनिवारी म्हणजेच 27 ऑगस्ट या आठवड्यात शनी अमावस्येच्या दिवशीच्या तिथीला वर्षभराच्या पूजेसाठी कुश नावाचा गवत गोळा करण्याची परंपरा आहे. भाद्रपद महिन्याची अमावस्या शुक्रवारी (२६ ऑगस्ट) आणि शनिवारी (२७ ऑगस्ट) असेल. पण 27 ऑगस्टला भाद्रपदात येणारी अमावस्या आता 2025 मध्ये येणार आहे. वास्तविक शनिदेवाचा जन्म अमावस्या तिथीला झाला होता, त्यामुळे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनि अमावस्या हा अतिशय शुभ दिवस आहे.
Read Also : गणपती बाप्पाला रडताना पाहण्यासाठी भाविकांची मंदिरात रांग
ज्या लोकांना सध्या शनिची साडेसाती आणि अडीच वर्ष त्यांनी या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. याशिवाय पिंपळावर दूध, पाणी आणि मिठाई अर्पण करावी. या दिवशी पितरांना प्रसन्न करून शनिदेवही प्रसन्न होतात. ज्या लोकांच्या राशीला साडेसाती आहे अशा लोकांनी शनिवार आणि अमावस्येच्या योगातही शनिदेवाची पूजा करावी. पूजा करताना शं शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करावा आणि शनिदेवासाठी तेल दान करावे.