Vastu Tips: रात्री झोपण्यापूर्वी करा हे छोटे काम, लक्ष्मी मातेच्या कृपेने व्हाल मालामाल

Vastu tips: वास्तूशास्त्रात सुख-समृद्धी, धनलाभासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. जाणून घ्या रात्री झोपण्यापूर्वी कोणते वास्तू उपाय करावे ज्यामुळे शुभ घडेल. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रात्री झोपण्यापूर्वी नक्की करा हे उपाय 
  • वास्तू उपायांमुळे तुम्हाला मिळेल सुख-समृद्धी

Vastu tips for money in Marathi : वास्तूशास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत ज्याद्वारे व्यक्तीला सुख-समृद्धीसह प्रगती मिळू शकते. या उपायांद्वारे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करुन अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण करता येते. घरातील सकारात्मक ऊर्जेमुळे कुटुंबात आर्थिक समस्या, संपत्ती आणि आरोग्यही चांगले राहते. घरात नकारात्मक ऊर्जा राहिल्यास त्याचा कुटुंबातील सदस्यांवर वाईट परिणाम होतो. यासोबतच व्यावसायिक नोकरीत अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात. अशा परिस्थितीत वास्तूशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. ज्याद्वारे व्यक्ती घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करू शकते. (do these things before sleeping you will get wealth vastu tips in marathi)

वास्तूशास्त्रानुसार, रात्री झोपण्यापूर्वी किचन आणि किचनशी संबंधित काही काम करुन घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे दूर केली जाऊ शकते. कर्जमुक्तीसाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात. 

अधिक वाचा : Astrology: चुकूनही या गोष्टी हातात देऊ नका...नाहीतर होईल नुकसान

रात्री झोपण्यापूर्वी करा हे वास्तू उपाय

स्वयंपाकघरात करा हा उपाय

वास्तूनुसार, रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात पाण्याने भरलेली बादली ठेवा, असे केल्याने व्यक्ती कर्जमुक्त होते आणि त्यासोबतच पैशांची अडचणही दूर होते.

अधिक वाचा : Jyotish Tips: रोज करा या 5 गोष्टी, तुमचे नशीब सूर्यासारखे चमकेल

बाथरूममध्ये करा हा उपाय

वास्तूशास्त्रानुसार, बाथरूममध्ये बादली कधीही रिकामी ठेवू नये. असे मानले जाते की, रात्री झोपण्यापूर्वी बाथरूममध्ये बादली भरून ठेवल्याने देवी लक्ष्मीमाता प्रसन्न होते. तसेच यामुळे घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही.

मुख्य दरवाजावर दिवा लावा

वास्तूशास्त्रानुसार, दररोज संध्याकाळी घरातील मुख्य दरवाजावर दिवा लावा आणि रात्रभर तो पेटू द्या. हे शक्य नसेल तर संध्याकाळच्या सुमारास दिवा लावा. त्यानंतर त्या दिशेने एखादी लाईट लावा. असे केल्याने लक्ष्मीमातेचे घरात वास्तव्य राहते.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी