मुंबई: अनेक लोक असे असतात ज्यांच्याकडे पैसा(money) टिकत नाही. महिन्याच्या शेवटची तारीख जवळ येत जाते तसे त्यांचा खिसा रिकामा होतो. यानंतर उरलेल्या दिवसांमध्ये घरचा खर्च भागवण्यासाठी त्यांना दुसऱ्यांकडून मदत घ्यावी लागते. लोकांना कळत नाही की अखेर त्यांच्यासोबत असे का होते. अखेर माता लक्ष्मी(laxmi mata) त्यांच्यावर का रागावते. ज्योतिषशास्त्राच्या(astrology) मते याचे गुपित त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये(kundli) लपले आहे. (Do this 3 upay for please mata laxmi)
अधिक वाचा - सहा तरुणींना लग्नाच्या नावे गंडा, सातवीनं घडवली अद्दल
ज्योतिष जाणणाऱ्या विद्वानांच्या मते कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीतील ११वा भाग इन्कम नियंत्रित राखण्याचे काम करतो. तर बुध ग्रह एखादया व्यक्तीच्या इन्कम आणि आऊटकमच्या क्षमतेला नियंत्रित ठेवते. जर एखाद्या कारणामुळे कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती कमजोर असेल तर त्या व्यक्तीकडे पैसा टिकत नाही. तसेच त्याची इच्छा असतानाही ती व्यक्ती बचत करू शकत नाही.
वास्तुशास्त्रात या स्थितीचेही निदान सांगितले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार घरात किचन स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवले पाहिजे. यामुळे अन्नपूर्णा प्रसन्न होते. तसेच माता अन्नपूर्णाला लक्ष्मी मातेचे दुसरे रूप मानले जाते. असे केल्याने तुमच्या हातात पैसा टिकण्यास सुरूवात होईल आणि तुमचा खिसा महिन्याच्या शेवटपर्यंत भरलेला राहील.
धर्म शास्त्रानुसार लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी वेळोवेळी गरजवंताना काही ना काही दान करत राहा. असे केल्याने पुण्यप्राप्ती होते. ज्यामुळे तुमचे घर सुख-समृद्धीने भरलेले राहते. तसेच कुटुंबात सातत्याने पैसा येत राहतो.
अधिक वाचा - झोपताना चुकूनही जवळ ठेऊ नका 'या' 5 वस्तू
घरात तिजोरीची जागा योग्य नसेल तर त्यामुळेही आर्थिक तंगी सहन करावी लागते. यासाठी तुम्ही तुमची तिजोरी उत्तर अथवा पूर्व दिशेला ठेवा. असे केल्याने तुमचा बँक बॅलन्स वाढेल आणि हातात सतत पैसा येत राहतो.
(डिस्क्लेमर - येथे देण्यात आलेल्या टिप्स या सामान्य माहितीवर आधारित आहेत. TIMES NOW याला दुजोरा देत नाही.)