Paush Purnima : नवी दिल्ली: हिंदू धर्मात (Hinduism) पौर्णिमा (Purnima) (पौर्णिमा 2022) ला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याची शेवटच्या तारखेला पौर्णिमा असते, त्यानंतर नवीन महिना सुरू होतो. पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू (Lord Sri Hari Vishnu) आणि लक्ष्मी देवीची (Goddess Lakshmi) पूजा केल्याने घरात सुख (Happiness), समृद्धी (Prosperity) आणि शांती नांदते, असे मानले जाते. या दिवशी सूर्य आणि चंद्र या दोघांची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील अडथळे दूर होतात.
यावर्षी पौष महिन्याची पौर्णिमा (पौष महिन्याची पौर्णिमा 2022) आज 17 जानेवारीला येत आहे, त्यानंतर माघ (माघ महिना 2022) हा नवीन महिना 18 जानेवारीपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होईल. पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि ध्यानासह पूजा, जप, तपश्चर्या आणि दान करण्याचा नियम असतो. पौष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा विधीनुसार केली जाते. या दिवशी पूजेच्या वेळी देवीला गुलाबी फुले अर्पण करावीत.