मुंबई: हिंदू धर्मात प्रत्येक एकादशी(ekadashi) भगवान विष्णूला(vishnu god) समर्पित करण्यात आली आहे. या दिवशी लोक उपवास करतात भगवान विष्णूची माता लक्ष्मीसह विशेष पुजा-अर्चा केली जाते. हिंदू पंचांगानुसार दर महिन्याला २ एकादशी येतात. यातील काही एकादशी या महत्त्वाच्या असतात. वैशाख मासातील कृष्ण पक्षाची एकादशी यापैकीच एक आहे. यातील एक महत्त्वाची एकादशी म्हणजे वरूथिनी एकादशीVaruthini Ekadashi. यावेळेस वरूथिनी एकादशी २६ एप्रिलला मंगळवारी आहे. Do this one thing on Varuthini Ekadashi you will get more money in life
अधिक वाचा - इतर राज्यांपैकी आंध्रमध्ये एड्सग्रस्तांची संख्या सर्वाधिक
वरूथिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या वराह रूपाची पुजा केली जाते. असे मानले जाते की या वरूथिनी एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने आणि भगवान विष्णूच्या वराह रूपाची पुजा केल्याने जीवनातील सर्व कष्ट, पाप तसेच दु:ख दूर होतात. या दिवशी केले जाणारे काही उपाय अपार धन देतात. तसेच आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करतात. जाणून घ्या काय उपाय केले जातात...
वरूथिनी एकादशी जेव्हा येथे तेव्हा खूप उन्हाळा अशतो. या दिवशी धान्य आणि पाण्याचे दान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या दिवशी पाणपोयी लावणे, पाण्याने भरलेली मडकी दान करणे. मंदिरांमध्ये अन्नदान करणे अथवा एखाद्या गरीबाला भोजन देणे यामुळे जीवनातील त्रास दूर होतील.
खूप धनदौलत मिळवण्यासाठी वरूथिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पुजा केल्याने केशर घातलेल्या दुधाने अभिषेक करा. यामुळे लवकरच तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
वरूथिनी एकादशीच्या दिवशी देवाची पुजा अर्चा केल्याने पिवळ्या रंगाच्या फळांचा प्रसाद लावा. ही फळे गरिबांना वाटा. यामुळे समस्या दूर होऊ लागतात.
वरुथिनी एकादशीच्या दिवशी पुजा-उपवास करा. दान करा. सोबतच घरी एखाद्या ब्राम्हाला बोलावून भोजन द्या. सोबतच पिवळी वस्त्रे, हळद, पिवळी फळे यांचे दान करा. यामुळे मनोकामना पूर्ण होतील
अधिक वाचा - लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये
रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी वरूथिनी एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा अथवा एखाद्या ब्राम्हणाकडून करवून घ्या. असे केल्याने रोगापांसून मुक्तता होईल. दर एकादशीला विष्णू सहस्त्रनामाचा जप करणे फायदेशीर ठरते.