Evening Worship: घर अथवा मंदिरात संध्याकाळी करताय पुजा? या गोष्टींचे ठेवा भान

आध्यात्म
Updated Apr 13, 2022 | 18:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Evening Worship Method: हिंदू धर्मात साधारणपणे लोक सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळेस पुजा करतात. ज्याप्रकारे सकाळी पुजेसाठी खास नियम आहेत तसेच संध्याकाळीही पुजेसाठी काही नियम सांगितले आहेत. 

worship
घर, मंदिरात संध्याकाळी करताय पुजा? या गोष्टी ठेवा लक्षात 
थोडं पण कामाचं
  • संध्याकाळी पुजा करताना घ्या विशेष काळी 
  • संध्याकाळच्या पुजेचे खास नियम
  • सूर्यास्तानंतर पुजा करताना द्या लक्ष

मुंबई: हिंदू धर्मात(hindu) दैनंदिन पुजा-पाठाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. हिंदू धर्मात देवाला नस्कार करण्यासोबतच मूर्तीपुजेलाही विशेष महत्त्व आहे. जे लोक दररोज सकाळ-संध्याकाळ पुजा(worship) करतात त्यांना या गोष्टींचे महत्त्व नक्की असते की पुजेसाठी वेळ आणि काळाचे विशेष महत्त्व आहे. ज्या पद्धतीने सकाळच्या पुजेला विशेष महत्त्व असते त्याच पद्धतीने संध्याकाळची पुजाही खास मानली जाते. जाणून घ्या सकाळी आणि संध्याकाळच्या पुजेसाठी काय आहेत नियम...

अधिक वाचा - धनंजय मुंडेंना हार्ट अटॅक नाही आला - अजित पवार

संध्याकाळच्या पुजेचे नियम

हिंदू धर्माच्या परंपरेनुसार लोक घरात दोन वेळेस पुजा करतात. एकदा सकाळी आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी. दरम्यान, फार कमी लोकांना हे मााहीत असते की दोन्ही वेळेच्या पुजा विधीमध्ये काही फरक आहे. संध्याकाळच्या पुजेदरम्यान काही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. 

शंख वाजवणे

घर असो वा मंदिर या दोन्ही ठिकाणी सूर्यास्ताच्या वेळेस देवाची पुजा-अर्चा केली जाते. मात्र जर तुम्ही सूर्यास्तानंतर रात्रीच्या वेळेस पुजा करत आहात तर ना शंख वाजवला पाहिजे ना घंटी वाजवली पाहिजे. सूर्यास्तानंतर देवी-देवता झोपण्यासाठी जातात त्यामुळे त्यांना जाग आणू नये. 

तुळशीची पाने

भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण पुजेसाठी तुळशीचा वापर प्रामुख्याने केला जातो. जर रात्रीच्या वेळेस पुजा करायची असेल तर सूर्यास्ताआधी तुळशीची पाने तोडून घ्या. रात्रीची तुळशीची पाने तोडू नका. 

अधिक वाचा - अखेर रणबीर-आलियाचं ठरलं !

सूर्य देव

शास्त्रा सूर्य देवाच्या पुजेसाठी दिवसाची वेळ सर्वोत्तम मानली गेली आहे. दिवसभरात कोणत्याही देवदेवतेच्या पुजेमध्ये सूर्य देवाचे आवाहन आणि पूजन गरजेचे आहे. अशातच या गोष्टीचे विशेष लक्ष ठेवले पाहिजे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी