मुंबई: हिंदू पंचांगातील पहिला महिना म्हणजे चैत्र महिना(chaitra month) खूप खास असतो. या महिन्यापासून हिंदूचे नववर्ष सुरू होते. चैत्र नवरात्री असते. गुढीपाडवा असतो. भगवान रामाचा जन्मदिवस रामनवमी(ram navami) असते. तसेच श्रीरामाचे परमभक्त हनुमानाचा जन्मदिवसही या महिन्यात येतो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पोर्णिमेला संकटमोचक हनुमानाचा जन्म झाला होता. यावर्षी १६ एप्रिलला हनुमान जयंती(hanuman jayanti) साजरी केली जात आहे. Do this things on Hanuman jayanti 2022
अधिक वाचा - ऑनलाइन गेमिंगमध्ये केवायसी होऊ शकते बंधनकारक...
ज्योतिषाच्या नजरेने पाहिल्यास एप्रिल महिन्यात मोठे बदल होत आहेत. या महिन्यात शनी, राहू-केतुसारखे ग्रह राशी बदल करत आहेत. यामुळे वाईट परिणाम आयुष्यावर होऊ शकतो. छाया ग्रह राहु-केतु १२ एप्रिल २०२२ला राशी बदल करत आहे. तर शनी २९ एप्रिलला गोचर करत आहे. ज्योतिषानुसार या क्रूर ग्रहांच्या स्थितीत बदल झाल्याने अशुभ परिणाम अनेकांच्या जीवनावर होणार आहे.