कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री करा हे उपाय, वर्षभर होईल धनवर्षाव

आध्यात्म
Updated Oct 29, 2020 | 16:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

kojagiri pournima: कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या काही गोष्टी केल्या तर लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर नेहमी राहते.

kojagari pournima
कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री करा हे उपाय, वर्षभर धनवर्षाव 

थोडं पण कामाचं

  • कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी रात्री जागरण करून लक्ष्मी मातेचे ध्यान केले पाहिजे.
  • या रात्री तांदळाची खीर मलमलच्या कपड्यामध्ये झाकून मोकळ्या आकाशाखाली ठेवावी
  • ज्या घरात स्वच्छता असते त्याच घरात लक्ष्मी मातेचा वास असतो

मुंबई: कोजागिरी पोर्णिमेची(sharad pournima) रात्र काही नेहमीची चांदणी रात्र नसते तर या रात्रीचे वर्णन अनेक कवींनी आपल्या कवितांमध्ये केले आहे. कोजागिरी पोर्णिमेला लक्ष्मी देवीचा(laxmi devi) जन्मदिवस साजरा केला जातो. चारही बाजूने चांदण्यांनी भरलेल्या आकाशात अमृताचा वर्षाव होत असतो. असं म्हटलं जात की दिवाळीच्या आधी लक्ष्मी मातेचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस असतो. या कोजागिरीच्या रात्री केलेले काही खास उपाय घरात धनवर्षाव करतात. जाणून घ्या हे उपाय

कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री चांदण्या रात्रीत अमृत वर्षा होत अशते. या रात्री तांदळाची खीर मलमलच्या कपड्यामध्ये झाकून मोकळ्या आकाशाखाली ठेवावी. दूध, तांदूळ आणि साखर हे तीनही जिन्नस लक्ष्मी मातेला प्रिय आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून लक्ष्मी मातेचा प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांना द्यावा. ही खीर खाल्ल्याने स्वास्थरूपी संपदा आणि आरोग्यरूपी वरदान लाभते. तसेच घरातून धनाची कमतरता दूर होते. 

लक्ष्मी मातेचा जन्मदिवस म्हणून कोजागिरी पोर्णिमा साजरी केली जाते. या रात्री झोपायचे नसते. कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी रात्री जागरण करून लक्ष्मी मातेचे ध्यान केले पाहिजे. या रात्री लक्ष्मी मातेचे ध्यान करण्यासोबतच विष्णू सहस्त्रनामाचा जप केला पाहिजे. 

दिवालीच्या आधी कोजागिरी पोर्णिमेला लक्ष्मी मातेला प्रसन्न केले जाते. पोर्णिमेच्या सकाळी स्नान करून तुळशीला दिवा लावा. याशिवाय  तुळशीला सफेद मिठाई अर्पण करा. असे केल्याने लक्ष्मी मातेची विशेष कृपा राहते. तुळशी मातेला प्रसन्न केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता स्वत: प्रसन्न होते. 

या दिवशी लक्ष्मी मातेचा जन्म दिवस असल्याने मातेला भेट म्हणून तिच्या प्रिय वस्तू तिला अर्पण करा. यात शिंगाडा, मखाणे, दही, पान आणि बत्ताशे प्रमुख मानले जाते. कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पुजेदरम्यान लक्ष्मी मातेला या वस्तू अर्पण केल्या पाहिजेत. त्यानंतर प्रसाद म्हणून सगळ्यांना द्याव्यात.या कुटुंबावर लक्ष्मी मातेची कृपा राहते. 

ज्या घरात स्वच्छता असते त्याच घरात लक्ष्मी मातेचा वास असते. दिवाळी लोक याच कारणामुळे साफसफाई करतात. कोजागिरी पोर्णिमेपासूनच आपल्या घरात साफ सफाईला सुरूवात केली पाहिजे. यामुळे घरातून सर्व प्रकारचे ग्रहदोष दूर होतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी