नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी करा या गोष्टी...होतीला अनेक लाभ

आध्यात्म
Updated Oct 16, 2020 | 15:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

navratri 2020: नवरात्रीत देवीचा अनेकजण नऊ दिवस उपवास करतात. या दिवशी उपवास करणाऱ्यांनी काही गोष्टींकडे जरूर लक्ष दिले पाहिजे.

navratri 2020
नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी करा या गोष्टी 

थोडं पण कामाचं

 • नऊ दिवस अखंड दीप तेवत ठेवावा
 • या नवरात्रीत मातेचे विशेष श्रृगांर केला पाहिजे.
 • नऊ दिवस उपवास ठेवणाऱ्या व्यक्तींनी या दिवसांत नखे कापू नयेत.

मुंबई: जीवनातील कोणतीही साधना ही शक्तीच्या पुजा-अर्चाशिवाय पूर्ण होत नाही. देवी पुराणात उल्लेख आढळतो की तुम्ही कोणत्याही देवाची पुजा करा मात्र त्यासोबत शक्तीची पुजा केली नाही तर ती पुजा पूर्ण मानली जात नाही. शक्ती पुजेशिवाय केली जाणारी कोणतीही पुजा अपूर्ण मानली जाते. यावर्षी २०२०मध्ये १७ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्राला(shardiya navratri 2020) सुरूवात होत आहे. २५ ऑक्टोबरला नवमी असून यादिवशी दसरा(dassera) आहे. तुम्ही जर नवरात्रीत नऊ दिवसांचा उपवास करत असाल तर खालील गोष्टी जरूर लक्षात ठेवल्या पाहिजेत. जाणून घ्या यंदाच्या नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी तसेच देवीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे. 

 1. नवरात्रीच्या प्रत्येकदिवशी स्नान वैगरे करून देवीच्या मंदिरात जाऊन पुजा आराधना केली पाहिजे. तसेच आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी सुख, शांती आणि समृद्धीचे जीवन मिळो अशी प्रार्थना केली पाहिजे. 
 2. जर तुम्ही दुर्गा मातासाठी अखंड दीप तेवत ठेवणार आहात, कलश ठेवत आहात तसे माता की चौकी स्थापन करत आहात तर संपूर्ण नऊ दिवस घर रिकामे ठेवू नये. 
 3. अखंड दिव्याचा अर्थ आहे की स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत नऊ दिवस हा दिवा अखंड पेटत राहावा. त्यामुळे दिव्यामध्ये नेहमी तेलवातीकडे लक्ष द्या. 
 4. नऊ दिवसांचे व्रत ठेवणाऱ्यांना काळ्या गोष्टी परिधान करू नयेत. नऊ दिवस देवीच्या पसंतीच्या रंगाचे कपडे परिधान करावेत. 
 5. नऊ दिवस उपवास ठेवणाऱ्या व्यक्तींनी या दिवसांत नखे कापू नयेत. तसेच केस अथवा दाढी वाढवू नयेत. मात्र लहान मुलांचे जावळ करणे शुभ मानले जाते. अनेक लोक नवरात्रीत कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन मुलांचे जावळ करतात. 
 6. या नवरात्रीत मातेचे विशेष श्रृगांर केला पाहिजे. श्रृगांरमध्ये देवीला चोळी, फुलांची माळ, हार, चुनरी, नथनी,पायात पैंजण, बांगड्या, अल्ता, बिंदी आणि नवे वस्त्र घातले पाहिजेत. 
 1. नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवीची पुजा केल्याने शुभ मानले जाते. या दिवशी एखाद्या ब्राम्हणाकडूनन पुजा करवून घेतली पाहिजे. तसेच नवदुर्गा स्त्रोताचे पठण केले पाहिजे. 
 2. नवरात्रीच्या नऊ दिवसांत कोणत्याही कन्येला उष्टे अन्न खायला घालू नये. तसेच कोणत्याही प्रकारचा अपमान करू नये. जेथे कन्यांचा अपमान केला जातो तेथे देवीचा वास नसतो. 
 3. नवरात्रीचे नऊ दिवस अन्न, लसूण, कांदा, मीठ, मांसाहार तसेच दारूचे सेवन करू नये. 
 4. साध्या मीठाऐववजी सैंधव मीठाचा वापर केला जाऊ शकतो. तसेच ज्या घरात उपवास केला जात नाही त्यांनी सात्विक भोजन करावे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी