Astrology Tips: शुक्रवारी करा जास्वंदाचे हे उपाय, होऊ शकता मालामाल

आध्यात्म
Updated Nov 25, 2022 | 11:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Friday Astrology tips: जर तुम्हाला घरात सुख-समृद्धी कायम ठेवायची आहे तर शुक्रवारच्या दिवशी जास्वंदीच्या फुलाचे काही सोपे उपाय तुम्ही करू शकता. 

hibisc
शुक्रवारी करा जास्वंदाचे हे उपाय, होऊ शकता मालामाल 
थोडं पण कामाचं
  • या फुलाला वास्तू आणि ज्योतिषाच्या हिशोबाने घरासाठी अतिशय शुभ मानले जाते.
  • याचे विशेष उपाय करून तुम्ही घरात सुख-समृद्धीची दारे उघडू शकता.
  • प्रामुख्याने शुक्रवारच्या दिवशी जास्वंदीच्या फुलांचे काही उपाय केल्यास तुमच्या घरात कधीच धन कमतरता राहणार नाही.

मुंबई: हिंदू धर्मात(hindu religion) अनेक झाडे, झुडुपे तसेच फुलांचे विशेष महत्त्व सांगितले आहे. अशी मान्यता आहे की जर पुजेदरम्यान देवी-देवतांना फुलांनी सजवले तर आपल्या जीवनात नेहमी आनंदीआनंद राहतो. अशाच फुलांपैकी एक म्हणजे जास्वंदीचे फूल(hibiscus flower). या फुलाचा वापर पुजेदरम्यान केला जातो. असे मानले जाते की देवी पुजनादरम्यान हे फूल अर्पण केल्याने घरात नेहमी आनंदी वातावरण राहते. Do this upay of hibiscus flower on friday will get benefit 

अधिक वाचा - अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेले पुरोगामी राज्याचे अनेक CM

या फुलाला वास्तू आणि ज्योतिषाच्या हिशोबाने घरासाठी अतिशय शुभ मानले जाते. तसेच याचे विशेष उपाय करून तुम्ही घरात सुख-समृद्धीची दारे उघडू शकता. प्रामुख्याने शुक्रवारच्या दिवशी जास्वंदीच्या फुलांचे काही उपाय केल्यास तुमच्या घरात कधीच धन कमतरता राहणार नाही. जाणून घेऊया तुम्ही या दिवशी काय उपाय करू शकता ते. 

सूर्यदेवाला जल अर्पण करताना जास्वंदीचे फूल करा अर्पण

असे मानले जाते की जर तुम्ही नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करत आहात तर तुमची बिघडलेली कामे होतील. जर शुक्रवारच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करताना त्यात एक चिमूट कुंकूसह एक लाल जास्वंदीचे फूलही अर्पण करा. यामुळे घरातील आर्थिक स्थिती सुधारेल. 

जर तुम्ही दर शुक्रवारी सूर्याला जल अर्पण करताना जास्वंदीचे फूलही अर्पण केले तर तुमच्यासमोर शत्रूचा टिकाव लागणार नाही. तसेच जीवनात नेहमी यश मिळेल. 

दुर्गा मातेला अर्पण करा लाल जास्वंदीचे फूल

पुजा करताना आपण फुले अर्पण करतो. मात्र जर तुम्ही दुर्गा मातेला जास्वंदीचे फूल अर्पण केले तर जीवनात चमत्कारिक परिणाम दिसून येतील. लाल जास्वंदीची 5 फुले शुक्रवारच्या दिवशी गणपती देवता आणि दुर्गा मातेला अर्पण करा. यातील एक फूल तिजोरीत ठेवा. या उपायाने तुम्हाला कधीच धनाची कमतरता भासणार नाही. जास्वंदीची फुले दर शुक्रवारी बदलत राहा. 

लक्ष्मी मातेला अर्पण करा जास्वंदीचे फूल

अशी मान्यता आहे की जर 11 शुक्रवार तुम्ही लक्ष्मी मातेला एक लाल जास्वंदीचे फूल अर्पण केले तर तुमच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. तसेच जर तुम्ही विवाहित आहात तर या उपायाने तुमचे वैवाहिक जीवन नेहमी आनंदीमय राहील. तसेच आपापसातील भांडणे दूर होतील. 

वैभवलक्ष्मीला अर्पण करा जास्वंदीचे फूल

शुक्रवारचा दिवस प्रामुख्याने वैभव लक्ष्मी मातेला समर्पित केलेला असतो. असे मानले जाते की जर या दिवशी वैभव लक्ष्मीच्या पुजेदरम्यान लाल जास्वंदीचे फूल अर्पण केले आणि मनातील इच्छा सांगितली तर जीवनात सुख-समृद्धी येते. तसेच या उपायाने नोकरीच्या संधीही निर्माण होतात. 

अधिक वाचा - नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन

लाल जास्वंदीचे अन्य उपाय

लाल जास्वंदीने धनसंपदा वाढते तसेच ग्रह पीडेपासून मुक्ती मिळते. जर तुम्ही सूर्य देवतेच्या उपासनेदरम्यान नियमितपणे जास्वंदीचे फूल अर्पण करत असाल तर हे तुमचे मन, मस्तिष्क नेहमी उर्जावान ठेवते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी