मुंबई: जन्माष्टमीचे पर्वकाही लोक आज म्हणजेच गुरूवारी साजरी करत आहेत. जन्माष्टमीचे हे पर्व सुख-समृद्धी, संतान, धन, सन्मान मिळवून देणारे असते. या दिवशी लोक भक्ती भावाने भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात. या दिवशी श्रीकृष्णाला प्रिय असलेले मोरपीसशी संबंधित काही उपाय केल्यास जीवनातील अनेक दु:खे दूर होतात तसेच अनेक इच्छा पूर्ण होतात. Do this upay of peacock feather will get more money
अधिक वाचा - कॉमेडिअन राजू श्रीवास्तव ब्रेन डेड
कालसर्प दोषापासून सुटका मिळवण्याचे उपाय - शास्त्रात असा उल्लेख आहे की भगवान श्रीकृष्णाला कालसर्पदोष होता. या दोषापासून सुटका मिळवण्यासाठी मोरपीस अतिशय फायदेशीर आहे. जर कालसर्प दोषाचा त्रास होत असेल तर जन्माष्टमी्या दिवशी घरात मोरपीस लावा आणि ते पुजेच्या ठिकाणी ठेवा.
धनप्राप्तीसाठी मोरपीसाचा उपाय - ज्या लोकांना आर्थिक चणचण आहे आणि ज्यांना भरपूर पैसा कमवायचा आहे त्यांनी जन्माष्टमीच्या दिवशी मोरपीस आणून पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा. असे केल्याने राहू आणि शनीच्या वाईट नजरेपासून मुक्ती मिळते. तसेच घरात वेगाने पैसा वाढू लागतो. मोरपीस घराच्या दक्षिण दिशेला ठेवणे चांगले मानले गेले आहे.
वास्तुदोष दूर करण्यासाठी मोरपीसाचा उपाय - मोराचे ८ पीस घराच्या उत्तर-पूर्व दिशेला अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरच्या व्यक्तीची नजर पडेल. यामुळे वास्तुदोष तसेच नकारात्मक उर्जा दूर होईल.
एकाग्रता वाढवण्यासाठी - जर मुलांचे अभ्यापासून मन भटकत असेल तसेच घरातील लोकांना निर्णय घेण्यास त्रास होत असेल तर त्यांनी आपल्याजवळ मोरपीस ठेवावे. यामुळे लाभ मिळेल.
अधिक वाचा - रायगडमध्ये दोन संशयास्पद बोट आढळल्या
वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी मोरपीसाचा वापर - घराच्या मुख्य दरावाजावर मोरपीस लावा यामुळे वाईट नजरेपासून घर तसेच घरातील लोकांचा बचाव होईल. जर मोरपीसासोबत बासरीही लावल्यास घरात नेहमी सुख-समृद्धी राहते.